Join us  

थोडक्यात All is Not Well; बिग बॉसमधून बाहेर पडलेल्या 'टॉकरवडी'ची भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 8:01 AM

Bigg Boss मराठीच्या ह्या टप्प्यावर बाहेर पडलेय ह्या दु:खातून मी अजून बाहेर पडले नाहीये असं अभिनेत्री अमृता देशमुखनं म्हटलं.

मुंबई - बिग बॉस मराठी स्पर्धेतील रंजक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता टॉप ५ स्पर्धकांसाठी ३ आठवडे शिल्लक आहेत. त्यात रविवारच्या आठवड्यात पुण्याची टॉकरवडी म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अमृता देशमुख हिचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. अमृता देशमुख हिच्या घरातील एक्झिटमुळे चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यात All is Well म्हणणाऱ्या बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेली अभिनेत्री अमृता देशमुख हिने इन्स्टाग्रामवर थोडक्यात All is Not Well म्हणत भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

अमृता देशमुख हिने पोस्टमध्ये म्हटलंय की, Bigg Boss मराठीच्या ह्या टप्प्यावर बाहेर पडलेय ह्या दु:खातून मी अजून बाहेर पडले नाहीये. थोडक्यात All is Not Well, काय चूक, काय बरोबर, कोण Fair, कोण Unfair हे Analysis तेव्हाही सुरू होतं आणि आत्ताही सुरू आहे. पण तुमच्या प्रेमामुळे आतमध्ये असताना मला ऊर्जा मिळत होती आणि त्याच गोष्टीमुळे आतासुद्धा मिळतेय. So Shower Some more positivity in the comment Section म्हणत तिने चाहत्यांना काहीतरी सकारात्मक कमेंट करावी जेणेकरून सगळं वाटेल All is Well हे लिहून तिने धन्यवाद दिले आहेत. 

बिग बॉस मराठीच्या या आठवड्यात २ एलिमिनेशन पार पडलं. यात शनिवारी विकास सावंत हा घराबाहेर पडला तर रविवारी अमृता देशमुख ही घराबाहेर पडल्याने अनेकांना धक्का बसला. या एलिमिनेशन राऊंडमध्ये किरण माने, अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, प्रसाद गवाथे, अमृता देशमुख हे स्पर्धेक होते. शेवटच्या क्षणी अपूर्वा नेमळेकर आणि अमृता देशमुख या दोघींमध्ये सुरक्षित कोण आहे हे मांजरेकरांनी इतर स्पर्धकांना विचारलं तेव्हा बहुमताने अपूर्वाचं नाव अनेकांनी घेतले. त्यानंतर मांजरेकरांनी अमृता देशमुख तुझा या घरचा प्रवास आज इथेच संपतोय असं जाहीर केल्यानंतर अमृताला अश्रू अनावर झाले. 

मागील २ आठवड्यापासून अमृता देशमुख हिने बिग बॉस मराठीच्या घरात दमदार खेळी खेळली. त्यामुळे अमृता स्ट्रॉंग प्लेअर असून ती टॉप ५ मध्ये नको असं म्हणत काही स्पर्धकांनी टास्कमध्ये तिचा फोटो लावून बॅग घराबाहेर फेकली होती. पण तीच या आठवड्यात गेल्यानं स्पर्धकांसह महेश मांजरेकरांनाही शॉक बसला. परंतु प्रेक्षकांच्या व्होटिंगवर स्पर्धकांचे भविष्य ठरत असते. त्यामुळे माझाही नाईलाज आहे अशी प्रतिक्रिया महेश मांजरेकरांनी व्यक्त केली. बिग बॉस मराठीचं हे पर्व संपायला आता ३ आठवडे शिल्लक आहेत. आता केवळ ८ स्पर्धक उरले असून त्यानंतर टॉप ५ स्पर्धक मिळणार आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात कोणाचा नंबर लागतो याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.  

टॅग्स :अमृता देशमुखबिग बॉस मराठीमहेश मांजरेकर