श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ या दिव्य कहाणीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आत्तापर्यंत या मालिकेत प्रेक्षकांनी श्रीराम जन्म, गुरुकुलातून परत आल्यानंतर आपला पिता राजा दशरथाशी झालेली त्याची भेट, त्राटिका राक्षसीशी त्याने केलेले युद्ध पाहिले आहे. आणि आता प्रेक्षक सीता-स्वयंवराचा सुंदर आणि महत्त्वाचा प्रसंग पडद्यावर अनुभवत आहेत. एका शापामुळे शिळा होऊन पडलेल्या अहिल्येचा उद्धार केल्यानंतर भगवान श्रीराम विश्वामित्र ऋषींसोबत मिथीला नगरीत येऊन पोहोचतात. येथे जनक राजाने आपल्या महालात योजलेल्या सीता स्वयंवरात श्रीराम सहभागी होतात. जनक राजा पण जाहीर करतो की, जो कुणी शिव धनुष्य उचलू शकेल, त्याला त्याची कन्या सीता वरमाला घालेल. श्रीराम केवळ ते धनुष्य उचलत नाहीत तर त्याला प्रत्यंचा लावून ते वाकवतात सुद्धा आणि ते धनुष्य मोडून पडते! अशाप्रकारे, सीता श्रीरामाशी विवाहबद्ध होते आणि सीता स्वयंवराचे समापन होते.
'श्रीमद् रामायण'मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास पुन्हा एकदा मिळणार पाहायला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 6:15 PM