श्रीरामाचे चरित्र आणि शिकवण विशद करणारे हे आपले प्राचीन महाकाव्य आहे, ज्याची लक्षणीयता आजही तशीच टिकून आहे. आपल्या विविध मालिकांमधून आजवर या वाहिनीने भारतीय टेलिव्हिजनवरील काही चिरस्मरणीय व्यक्तिरेखा सादर केल्या आहेत. यावेळी नव्या पिढीला श्रीरामाचे चरित्र आणि त्यातील सौंदर्य आणि सुजाणतेचा अनुभव देण्यासाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन एक अशी मालिका घेऊन येत आहे, जिची कथा सर्व भारतीयांच्या आस्थेचा विषय आहे. श्रीमद् रामायण ही मालिका १ जानेवारी, २०२४ पासून सुरू होत आहे आणि दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता ती प्रसारित करण्यात येईल.
मालिकेत अभिनेता सुजय रेऊ मर्यादा पुरुषोत्तम रामाची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि प्राची बन्सल सीतेची भूमिका करत आहे. त्या व्यतिरिक्त, निकितीन धीर बलाढ्य रावणाच्या भूमिकेत, निर्भय वधावा महाबली हनुमानाच्या भूमिकेत, बसंत भट्ट निष्ठावान लक्ष्मणाच्या, आरव चौधरी राजा दशरथाच्या आणि शिल्पा सकलानी राणी कैकयीच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत वेशभूषा, सेट डिझाईन आणि व्हिजुअल इफेक्ट्सवर बारकाईने लक्ष देण्यात आले आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना उत्कृष्ट व्ह्यूइंग अनुभव मिळेल आणि ही मालिका प्रेक्षकांना अयोध्या आणि लंकेच्या मनोरम विश्वात घेऊन जाईल.