Bigg Boss Marathi Season 5: 'कलर्स मराठी'वरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून योगिता चव्हाण (Yogita Chavan) घराघरात पोहचली. सर्वगुणसंपन्न, हवीहवीशी वाटणाऱ्या तिच्या अंतराच्या भूमिकेतून तिने प्रेक्षकांची मने जिंकली. आता 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमध्येही तिचा चांगलाच बोलबाला आहे. सातारकर असणाऱ्या योगिताचा जन्म ठाण्यात झाला आहे. नृत्यात करिअर करण्याची तिची इच्छा होती. त्यामुळे 'मराठी बाणा' या कार्यक्रमात ती सहभागी झाली. इंडस्ट्रीत बॅकग्राऊंड डान्सर म्हणून तिने काम सुरू केले. पडद्यामागे काम करत सुरू झालेला तिचा प्रवास आता 'बिग बॉस मराठी'पर्यंत पोहोचला आहे.
'बिग बॉस मराठी'बद्दल योगिता म्हणाली, बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून योगिता काय आहे हे प्रेक्षकांना कळणार आहे. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे. १०० दिवस सोशल मीडिया आणि फोनपासून मी दूर असणार आहे. घरच्यांना 'बिग बॉस मराठी'मध्ये जाण्याबाबात सांगितलं तेव्हा सर्वच खूप आनंदी होते. सासरकडची मंडळीदेखील खूप समजूतदार आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरात जा आणि लढ असं त्यांनी सांगितले.
योगिता पुढे म्हणाली की,बिग बॉस मराठीच्या घरात जाण्याआधी शेवटचा कॉल मी माझ्या बाबांना केला होता. 'बिग बॉस मराठी'च्या घरात एखादी व्यक्ती घेऊन जाण्यास परवानगी दिली तर मी माझ्या नवऱ्याला घेऊन जाईल. माझा पती खूप मनोरंजक आहे. तो घरात माझा खूप चांगला सांभाळ करेल. यंदाच्या सीझनमध्ये एक फ्रेशनेस आहे. नावीन्य असणाऱ्या सीझनचा मी भाग आहे याचा आनंद आहे. बिग बॉस मराठी जिंकण्याचं मी काही प्लॅनिंग केलेलं नाही. 'बिग बॉस मराठी'च्या घरात मला फक्त मजा करत खेळायचं आहे.