Join us

"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 08:31 IST

'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) मधून अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) घराघरात पोहचला. विनोदाचे अचूक टायमिंग साधत त्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) मधून अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) घराघरात पोहचला. विनोदाचे अचूक टायमिंग साधत त्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सध्या कुशल सोनी टिव्हीवरील 'मॅडनेस मचाऐंगे' या हिंदी कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. दरम्यान आता त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कुशल बद्रिकेने 'मॅडनेस मचाऐंगे'च्या सेटवरील फोटो शेअर केला आहे, ज्यात त्याच्यासोबत हेमांगी कवी आणि अतिषा नाईक दिसते आहे. त्याने हा फोटो शेअर करत लिहिले की, आई आणि बायकोच्या राड्यात नेमकी कुणाची बाजू घ्यायची ? हया प्रश्नाच उत्तर कुणाला तरी सापडलंय का ? मॅडनेसच्या मंचावर आतीशा ताईसोबत आम्ही दोघे.

कुशलच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. एका युजरने लिहिले की, बायको अरे ती गोड आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, कुशल तुला आणि हेमांगीला पाहून आनंद झाला! तुम्ही दोघं रॉकिंग आहात. 

वर्कफ्रंटकुशल बद्रिकेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तो 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय शोमध्ये काम करत होता. पण सध्या या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. तो सध्या हेमांगी कवीसोबत 'मॅडनेस मचाएंंगे' या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये झळकत आहे.  

टॅग्स :कुशल बद्रिकेचला हवा येऊ द्या