सन मराठी वाहिनीवरील सर्वांची लाडकी 'कॉन्स्टेबल मंजू' (Constable Manju) या मालिकेतील नायक-नायिकांचा खास प्रवास एका अनोख्या अंदाजात वटपौर्णिमेच्या भागात पाहायला मिळणार आहे. या वटपौर्णिमेला कॉन्स्टेबल मंजू मालिकेतील प्रमुख पात्रांचा विशेष व रोमांचक प्रवास घराघरात पोहोचणार आहे. वटपौर्णिमा हा सण आपल्या जीवनात नवी ऊर्जा आणि प्रेमाचे नवीन रंग घेऊन येतो. ह्या व्रतामध्ये पती-पत्नीच्या अतूट नात्याचे आणि एकमेकांच्या सुख-दुःखात नेहमी साथ देण्याचे वचन असते. अशा या पवित्र वटपौर्णिमेच्या दिवशी, सत्या आणि मंजूच्या प्रेमाची नवीन परिभाषा आपल्याला पाहायला मिळणार आहे. सत्या आणि मंजूचं नुकतेच लग्न झालंय त्यात सत्या आणि मंजूला हे लग्न मान्य नाहीये परंतु ऑन ड्युटीवर असलेल्या मंजूला वटपौर्णिमेचा शुभ दिवस खरंतर खूप चॅलेंजिंग असणार आहे. पोलिस बंदोबस्तासाठी उभी असणारी मंजूला तात्यासाहेब हे त्यांच्या राजकारणी फायद्यासाठी वटपौर्णिमेच्या विधी पूर्ण करायला भाग पाडतात, नेहमी स्त्रियाच हे वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण करतात मग पुरुष हे व्रत पूर्ण का नाही करू शकत असे तात्या साहेब ऑन ड्युटीवर असलेल्या मंजुला सांगतात. वटपौर्णिमेचा हा खास दिवस महिलांसाठी खूप आवडीचा असतो या दिवशी स्त्रिया नवीन साडी परिधान करून, नटून थटून वडाची पूजा करतात, परंतु मंजू ही पोलिसांच्या गणवेशातच ही विधी पूर्ण करणार आहे. त्यावेळी तिच्यासोबत सत्यादेखील पाहायला मिळणार आहे.
सत्या आणि मंजू हे दोघे एकत्र येऊन वटपौर्णिमेचा व्रत पूर्ण करणार आहेत.सत्या आणि मंजू या दोघांच्याही मनात नसताना हे व्रत त्यांना पूर्ण करावे लागणार आहे. आता नियतीचा हा खेळ सत्या व मंजुच्या आयुष्यात कोणत्या नवीन अडचणी निर्माण करणार की वटपौर्णिमेचा या खास दिवशी दोघांच्या नात्यात प्रेमाची उधळण होणार, हे आपल्याला येत्या २१ जूनला आपल्या लाडक्या सन मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.