स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने सोनी टिव्हीवरील कलाकारांनी देशावरील आपलं प्रेम व्यक्त करताना आपल्या देशभक्तीच्या आठवणी जागवल्या आहेत.
राजेश्वरी सचदेव 'दिल हि तो है'मधली ममता – “माझ्यासाठी स्वातंत्र म्हणजे मुक्त बोलण्याचे आणि तुम्हाला वाटते तसे हवे तसे व्यक्त होण्याची सुट आहे.तुमचा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र – सांस्कृतिक, अध्यात्मिक किंवा व्यावसायिक दृष्ट्या. आपल्या देशाला काही रूढी परम्पारातून बाहेर आणावे लागणार आहे. माणसातील सयंम कमी होतो आहे, आपण एकदम एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देतो, आणि लोकांबद्दलची स्वीकृती कमी होते आहे. तसेच, कृतज्ञता कोणाकडेच राहिली नाही. आम्ही जेव्हा शाळेत ध्वज वंदनासाठी जायचो, तेव्हा आमच्यासाठी तो फक्त एक सुट्टीचा दिवस असायाचा. पण जसजसे मोठे होत गेलो तसे, समजत गेले स्वतंत्र म्हणजे काय ते. आपण स्वतंत्र भारतात जन्माला आल्यामुळे आपल्याला स्वातंत्र्याची खरी किंमत कळलेलीनाहीय.
आकांक्षा पुरी 'विग्नाहार्ता गणेश'मधील पार्वती - “मी एका प्रामाणिक पोलिसाची मुलगी आहे, त्यामुळे मी माझ्या वाडिल्यांना पोलीस स्टेशनवरील ध्वज वंदन करताना पहिले आहे, त्या खूप सुंदर आठवणी माझ्याकडे आहेत.मी शाळेत ह्या दिवसाची आतुरतेने वाट बघायचे कारण, मला तो पांढरा गणवेश घालता यायचा आणी त्यावरील आवडता भारतीय बिल्ला.शाळेतील प्रभात फेरीतील सहभाग, त्या विशेष मिठाई साठी वाट बघणे, मैत्रीनींची मिठाई खाणे अश्या अनेक गोष्टींमुळे मी खूप खुश असायचे. मी ‘विग्नाहार्ता गणेश’ ह्या मालिकेत पार्वती साकारते आहे, त्यात मला देवीची अनेक रुप साकारता आली, आणि अशा प्रकारे मी नारी स्वतंत्र वर प्रकाश टाकू शकले.” नमिष तनेजा ‘में मेके चली जाऊंगी तुम देखते रहियो’मधील समर – “स्वतंत्र दिन हा माझ्यासाठी कायमच एक सुंदर सोहळा राहिला आहे. मी लहान असताना पतंग उडवायचो. ह्या देशातील कुठली गोष्ट मला बदलायची असेल तर ती आहे, एकमेकानबद्दल ची सहिष्णुता, आपण जर ह्या वर मात करू शकलो तर आपण प्रगती करू आणि भारत देश अधिक सुफलाम बनवू.मी ह्या स्वतंत्र दिनी माझ्या परिवार सोबत राहीन, आणि वीर जवानांसाठी प्रार्थना देखील करेन. सहावीपर्यंत मी शाळेत महात्मा गांधी ह्यांची भूमिका साकारली आहे. माझे भाषण झाल्यावर सगळ्या शाळेने माझे उत्साहपूर्ण कौतुक केले होते. हा स्वतंत्र दिन माझ्यासाठी खास आहे, कारण मी माझा नवीन शो ‘में मेके चली जाऊंगी तुम देखते रहियो’ सुरु केला आहे.”
अशी सिंह ‘यह उन दिनो कि बात है’मधील नैना – “ स्वतंत्र म्हणजे तुम्हाला खुश ठेवतील अश्या गोष्टी करणे. मला वाटते भारतात सगळ्यांनी न्याय निवडा पासून मुक्त व्हावे आणि ज्याला जे करायचे आहे त्याचे स्वतंत्र असावे. ह्या वर्षी मी ‘यह उन दिनो कि बात है’ च्या सेट्स वर ध्वज वंदन करणार आहे, आणि राष्ट्रगीत सुद्धा म्हणणार आहे. मला आठवते आहे शाळेत असताना मी भारत माता चा पेहराव करून तिची भूमिका साकारायचे, आणि त्यासाठी माझे खूप कौतुक झाले होते. ‘यह उन दिनो कि बात है’ ह्या मालिकेमुळे मला माझ्या बालपणाच्या आठवणी उजळण्याची संधी मिळाली.”
तोरल रसपुत्रा ‘मेरे साई’, मधील बायजाची – “स्वातंत्र्य म्हणजे स्त्री पुरुष समानता. मला वाटते आपण आपल्या हक्कासाठी लढले पाहिजे. माझ्या ‘मेरे साई’ ह्या मधील बायजा ही सुद्धा सत्यासाठी लढते आणि सभोवतालच्या लोकांना मदत करते. लहानपणी मी कायम स्वतंत्र दिनाच्या सोहळ्यात सहभागी व्हायचे.मी डान्स ची तालीम आणि भाषणाचा सराव कार्यक्रमाच्या 3 दिवस आधीच करायचे. 15 ऑगस्ट च्या दिवशी मी माझ्या भाच्या सोबत बसून टीव्ही वरील परेड दाखवणार आहे, तो खरच एक कौतुकाचा भाग असेल. मी सगळीकडे आनंद वाटायचा आहे”. असे तोरल रसपुत्रा म्हणते.