सोनी सबच्या 'इंडिया के मस्त कलंदर' म्हणजेच आयएमके या नव्या शोच्या माध्यमातून विकेंड गाजवण्यास सज्ज झाले आहे. या कार्यक्रमात देशभरातील निवडक आणि आगळ्यावेगळ्या प्रतिभावंतांमधून सर्वोत्कृष्ट प्रतिभावंताची निवड केली जाणार आहे. या कार्यक्रमाचा फॉरमॅट खूप वेगळा असून विनोदाचा पाऊस पाडणारे अतिशय गंमतीशीर स्पर्धक यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. देशभरातील जनतेला आपली प्रतिभा दाखवण्याची संधी देणाऱ्या या कार्यक्रमातील स्पर्धकांची निवड ऑनलाइन ऑडिशन्सच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या ऑडिशनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळणार यात काहीच शंका नाही. 'इंडिया के मस्त कलंदर' या कार्यक्रमाचे अभिनेता सुमीत राघवन सूत्रसंचालन करणार आहे तर मिका सिंग आणि गीता कपूर या कार्यक्रमाचे परीक्षक आहेत. या कार्यक्रमाच्या संकल्पनेविषयी मिका सांगतो, "मी गायनाच्या अनेक शोमध्ये परीक्षक होतो. मात्र, 'इंडिया के मस्त कलंदर' हा कार्यक्रम आजवरच्या माझ्या सगळ्या कार्यक्रमापेक्षा खूपच वेगळा आहे. इथे मी अशा स्पर्धकांना पाहणार आहे जे काहीही करू शकतात… गाणं, फ्री स्टाइल डान्स, रोबोट डान्स, वेंट्रिलोक्विझम आणि बरंच काही. हा माझ्यासाठी एक अगदी नवा अनुभव असेल. आपल्या अनुभवाबद्दल गीता कपूर सांगते, "'इंडिया के मस्त कलंदर'मध्ये परीक्षक म्हणून जाण्यास मी उत्सुक आहे. परीक्षकाच्या मानाच्या खुर्चीवर बसल्यानंतर, समोरचे परफॉर्मन्स पाहताना जी ऊर्जा अनुभवता येते, त्याचे आता मला व्यसन लागले आहे असेच मला वाटत आहे. या कार्यक्रमात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिभा पाहण्यासाठी आता मी फार काळ वाट पाहू शकत नाही."प्रसंगानुरूप विनोदबुद्धीसाठी लोकप्रिय असलेला अभिनेता सुमीत राघवन सांगतो, "गीता कपूर आणि मिकासोबत काम करण्याची संधी लाभल्याने मी भारावून गेलो आहे. 'इंडिया के मस्त कलंदर' हा आगळावेगळा कार्यक्रम आहे. इथे स्पर्धकांना आपल्या 'टॅलेंट'ला एक नवा आयाम द्यायचा आहे. मला लोकांना हसवायला आवडतं आणि प्रेक्षक आणि स्पर्धक या दोघांचीही साथ देण्यास आता मी उत्सुक आहे."
इंडिया के मस्त कलंदर या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार या गोष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 3:59 PM