इंडियन आयडॉल १० मध्ये दही हंडी हा भारतातील एक अत्यंत जोशपूर्ण उत्सव या सेट्सवर साजरा करण्यात आला. हा एक समूह खेळ आहे, ज्यामध्ये अनेक तरुण मिळून एक अनेक थरांचा मानवी मनोरा रचतात आणि वर दोरीवर टांगलेली दहीहंडी फोडतात. या सोहळा साजरा करण्यासाठी सर्व स्पर्धक एकत्र जमले आणि त्यांनी कुणाल पंडितच्या नावाचा जयघोष केला. कारण तो त्या मानवी मनोर्यावर चढला होता. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉलचे सर्व बारा स्पर्धक आपल्या दमदार गाण्यांनी जगभरातील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. मुंबईचा पोरगा कुणाल पंडित याने आपल्या अप्रतिम गाण्याने तिन्ही परीक्षक आणि प्रेक्षकांना थक्क केले. या अष्टपैलू गायकाला आपल्या मित्रांच्या चमूसह सेटवर दहीहंडीचा सोहळा साजरा करण्याची देखील मस्त संधी मिळाली. या गायकाला हंडी फोडण्यासाठी वर वर चढताना पाहणे हा खूप रंजक क्षण होता.
सेटवरील सूत्राने सांगितले की, “नवोदित कलाकरांच्या उत्तम गाण्यांबरोबरच इतर उपक्रमांमुळे इंडियन आयडॉलचा सेट नेहमी गजबजलेला असतो. यावेळी कुणाल पंडितला आपल्या इतर सवंगड्यांसह दहीहंडी हा मुंबईतील आवडता उत्सव साजरा करण्याची नामी संधी मिळाली. त्याच्या गायन कौशल्यामुळे सर्व परीक्षक, प्रेक्षक आणि खास पाहुणे जे पी दत्ता, सोनू निगम आणि जावेद अख्तर देखील खूप प्रभावित झाले. आणि दहीहंडीचे अद्भुत दृश्य इंडियन आयडॉलच्या सेटवर पाहणे ही एक पर्वणीच होती. परीक्षकांपासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वजण उत्साहाने टाळ्या वाजवत होते आणि आनंद लुटत होते.”