Join us

सायली कांबळेमुळे इंडियन आयडॉल अडकला वादाच्या भोवऱ्यात, गरीब असल्याचे सांगितले खोटे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 13:11 IST

सायली कांबळेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे सांगत इंडियन आयडॉलने लोकांची फसवणूक केली अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

ठळक मुद्देसायली कांबळेचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ती सुरेश वाडकर यांच्यासोबत गाताना दिसत आहे.

इंडियन आयडॉल या कार्यक्रमाचे हे पर्व एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांचे आवाज तर प्रेक्षकांना आवडत आहेत. पण त्याचसोबत या कार्यक्रमातील काही स्पर्धकांमुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. काही स्पर्धक त्यांच्या परिस्थितीच्या बाबतीत खोटं बोलत असल्याचा आरोप सोशल मीडियाद्वारे केला जात आहे. 

इंडियन आयडॉल 12’च्या ऑडिशनदरम्यान सवाईने आपली गरिबीची कहाणी ऐकवली होती. कळसूत्री बाहुल्यांचा खेळ दाखवून मिळणाऱ्या पैशातून घर चालवत असल्याचा आणि अतिशय हलाखीचे आयुष्य जगत असल्याचे त्याने सांगितले होते. त्याची ती कहाणी ऐकून सगळ्यांचेच डोळे पाणावले होते. याच सवाई भट्टचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोत तो स्टेजवर परफॉर्म करताना दिसला होता.  यावरून त्याच्या गरिबीच्या दाव्यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. आता असाच प्रश्न सायली कांबळेच्या बाबतीत निर्माण झाला आहे.

सायली कांबळेचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ती सुरेश वाडकर यांच्यासोबत गाताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. सायलीने इंडियन आयडॉल या कार्यक्रमात सांगितले होते की, ती एका चाळीत राहाते आणि तिच्या घरात टिव्ही देखील नाहीये. तसेच तिचे वडील रुग्णवाहिका चालक आहेत. सायलीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत इथपर्यंत मजली मारली, यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत होते. पण सुरेश वाडकर यांच्यासारख्या दिग्गजांसोबत ती स्टेज परफॉर्मन्स देताना व्हिडिओ व्हायरल झाल्याने ती तिच्या परिस्थितीबाबत खोटे बोलत होती अशी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

टॅग्स :इंडियन आयडॉल