Join us

शूटआधी जे सांगितलं, तेच मी केलं! अमित कुमार यांनी केली ‘इंडियन आयडल 12’ची ‘पोलखोल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 15:32 IST

Indian Idol 12 : ‘इंडियन आयडल’ एक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो आहे, यात शंका नाही. पण या शोच्या ‘किशोर कुमार स्पेशल’ एपिसोडमध्ये जे काही झाले ते पाहून नेटकरी प्रचंड संतापले.

ठळक मुद्दे‘इंडियन आयडल 12’च्या किशोर कुमार स्पेशल एपिसोडमध्ये का गेलात? असे विचारले असता पैशांसाठी अशी प्रामाणिक कबुली त्यांनी दिली.

‘इंडियन आयडल 12’ (Indian Idol 12 ) हा एक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो आहे, यात शंका नाही. पण या शोच्या गेल्या वीकेंडच्या ‘किशोर कुमार स्पेशल’ एपिसोडमध्ये जे काही झाले ते पाहून नेटकरी प्रचंड संतापले. नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया या शोच्या दोन जजेसला तर युजर्सनी अक्षरश: फैलावर घेतले. शोमध्ये नेहा व हिमेश यांनी किशोर कुमार यांना ट्रिब्युट देत त्यांची गाणी गायलीत आणि ही गाणी ऐकून संतापले. किशोर कुमार (Kishore Kumar) यांचे चिरंजीव गायक अमित कुमार (Amit Kumar) हे या एपिसोडमध्ये स्पेशल गेस्ट म्हणून सहभागी झाले होते, आता त्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

लोकांनी केले जबरदस्त ट्रोल...इंडियन आयडल, कृपा करून किशोर कुमार यांच्या गाण्यांना सोडा. त्यांची गाणी इतक्या खराब पद्धतीने सादर केलेली मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले. नेहा कक्कर, हिमेश रेशमिया, अनु मलिक व स्पर्धकांनी माझ्या आवडत्या गाण्याचा अक्षरश: बँड वाजवला, असे एका युजरने लिहिले. माफ करा, पण हिमेशने तर किशोर कुमार यांच्या गाण्यांचा अक्षरश: खून केला, अशी संतप्त प्रतिक्रिया एका युजरने दिली.

अमित कुमार यांनी केली पोलखोलई-टाईम्सशी बोलताना अमित कुमार यांनी ‘इंडियन आयडल 12’च्या किशोर कुमार स्पेशल एपिसोडवर प्रतिक्रिया दिली. ‘हा एपिसोड पाहूल लोक संतापले आहेत, हे मला माहित आहे. किशोर कुमारसारखे कुणीच गाऊ शकत नाही, हे सत्य आहे. आजच्या तरूणांना किशोर कुमार यांच्याबद्दल काहीही माहित नाही. त्यांना फक्त रूप तेरा मस्ताना हे गाणे माहित आहे. मी ‘इंडियन आयडल 12’च्या एपिसोडमध्ये गेलो आणि मला जे काही करायला सांगितले होते, तेच मी केले. सर्वांची भरभरून प्रशंसा करण्यास मला सांगितले होते. स्पर्धकांनी कसाही परफॉर्मन्स दिला तरी त्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांची प्रशंसा करा, असे मला सांगितले गेले होते. मी तर अ‍ॅडव्हान्समध्ये स्क्रिप्टही मागितली होती. पण त्यांनी ती दिली नाही,’ असे ते म्हणाले.

पैसे मिळाले, म्हणून गेलो...‘इंडियन आयडल 12’च्या किशोर कुमार स्पेशल एपिसोडमध्ये का गेलात? असे विचारले असता पैशांसाठी अशी प्रामाणिक कबुली त्यांनी दिली. प्रत्येकाला पैशाची गरज आहे. मी मागितले तेवढे पैसे मला दिले आणि मी शोमध्ये गेलो आणि मी का जाऊ नये? पण ठीक आहे. शो, त्याचे जजेस, स्पर्धक सर्वांबद्दल माझ्या मनात आदर आहे. या एपिसोडमध्ये जे काही झाले, तसे कधीकधी घडते. पण हो, यानंतर किशोर कुमार यांना ट्रिब्युट देत असाल तर यापद्धतीने देऊ नका, असे मी त्यांना सांगेल. मी स्वत: तो एपिसोड एन्जॉय करू शकलो नाही. माझ्या चेह-यावर खूप लाईट पडत होता. मी मुळातच कम्फर्टेबल नव्हतो, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :इंडियन आयडॉलअमित कुमारकिशोर कुमार