‘इंडियन आयडल 12’ (Indian Idol 12) हा सिंगींग रिअॅलिटी शो गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे तो वादामुळे. एकीकडे शोचा होस्ट आदित्य नारायण ट्रोल होतोय, दुसरीकडे शोची कंटेस्टंट शन्मुखप्रिया (Shanmukhapriya) हिलाही सोशल मीडियावर ट्रोल केले जातेय. तिच्या परफॉर्मन्सवर नाराजी व्यक्त करत, अनेकांनी तिला शो बाहेर हाकलण्याची मागणी केली आहे. आता या ट्रोलर्सला शन्मुखप्रियाने सणसणीत उत्तर दिले आहे. ( Indian Idol 12 contestant Shanmukhapriya reacts to trolls)
‘मला शोबाहेर हाकलण्याची मागणी होतेय, हे मला माझ्या काही शुभचिंतकाकडून माहिती झाले. मी सोशल मीडियावरच्या ट्रोलर्सला फार महत्त्व देत नाही. ट्रोलर्स माझ्यासाठी चिमूटभर मीठासारखे आहे. मायकल जॅक्सनसारखा महान कलाकारही टीकेतून सुटला नाही. त्यालाही टीका सहन करावी लागली, मग ती तर खूप लहान आहे. सिंगींग हे माझे पॅशन आहे आणि येणा-या एपिसोडमध्ये मी उत्तम गाण्याचा प्रयत्न करू शकते, इतकेच,’ असे शन्मुखप्रिया Yo! Vizag ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.शन्मुख प्रियाची आईही यावर बोलली़ शन्मुख प्रयोगशील गायिका आहे. गाण्याची निवड करण्याची गोष्ट आहे तर सर्व स्पर्धक शो रनर्सनी निवडलेली गाणीच गातात. शन्मुखवर टीका होत असूनही ती नशीबवान आहे. कारण आता तिला लोकांचे दुप्पट प्रेम मिळतेय, असे तिची आई म्हणाली.
काय आहे वाद?शन्मुखप्रियाने गेल्या एपिसोडमध्ये आशीष कुलकर्णीसोबत ‘हमको सिर्फ तुमसे प्यार है’ हे गाणे गायले होते. पण लोकांना या गाण्यावर तिचा परफॉर्मन्स आवडला नव्हता. यावरून लोकांनी तिला शो बाहेर हाकलण्याची मागणी केली होती. हिने एका सुंदर गाण्याचा सत्यानाश केला, हिला हाकला, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या होत्या.