सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉलचा बाराव्या सीझन वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येतो आहे. या सीझनमधील स्पर्धक निहाल तौरो आणि दानिश मोहम्मद हे दोघे हा आनंद उपभोगत आहेत. स्वतःला निसर्गप्रेमी म्हणवून घेणारे निहाल आणि दानिश यांनी झाडे लावण्याचे, प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचे आणि निसर्गासाठी शक्य ती खटपट करण्याचे मनावर घेतले आहे. या दोन्ही स्पर्धकांना वाटते की, निसर्ग त्यांना मनःशांती मिळवून देतो आपल्या गाण्यावर लक्ष केंद्रित करण्यासही मदत करतो. याबद्दल निहाल तौरो म्हणतो, मी मंगलोरचा आहे आणि हा प्रांत खूप हिरवागार आहे. मी निसर्गप्रेमी आहे आणि झाडे लावणे हा माझा छंद आहे. त्यामुळे मी आणि दानिशने ठरवले की, आपल्या आसपास शक्य असेल तिथे झाडे का लावू नयेत! त्यामुळे आमच्या हॉटेलच्या लॉनच्या सभोवती झाडे लावण्याचे आम्ही ठरवले.
वृक्षारोपण ही प्रक्रियाच माझ्या मनाला खूप आनंद देते, कारण त्यात माझा तणाव दूर होतो आणि माझी एकाग्रता वाढते. दानिशसोबत नवी झाडे लावणे हा खरोखर आनंददायक अनुभव होता. शिवाय एकत्र काम करण्यात ही मजा आली. आम्ही आता हे काम चालूच ठेवू आणि आसपासचा भाग हिरवागार करून टाकू.”