Join us  

Indian Idol 12 फेम सायली कांबळेला पडली 'अंगारो सा..'ची भुरळ, अल्लू अर्जुन-रश्मिकाच्या गाण्यावर धरला ठेका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 6:43 PM

इंडियन आयडॉल १२ (Indian Idol 12) मधून घराघरात लोकप्रिय झालेली गायिका सायली कांबळे (Sayali Kamble) हिनेदेखील अंगारो सा गाण्याच्या फ्युजनवर डान्स केला आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

साऊथचा प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन सध्या त्याच्या आगामी 'पुष्पा २- द रुल' (Pushpa 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रेक्षक त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) अभिनीत या चित्रपटातील दुसरे गाणे 'अंगारो सा' (Angaro Sa Song) अलिकडेच रिलीज झाले. हे गाणं लोकांना खूप आवडतंय. या गाण्यामुळे लोकांचा चित्रपटाबद्दलचा उत्साहही वाढला आहे. हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. या गाण्यावर नेटकऱ्यांसह कलाकारही ठेका धरताना दिसत आहे. दरम्यान इंडियन आयडॉल १२ (Indian Idol 12) मधून घराघरात लोकप्रिय झालेली गायिका सायली कांबळे (Sayali Kamble) हिनेदेखील अंगारो सा गाण्याच्या फ्युजनवर डान्स केला आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

गायिका सायली कांबळे सध्या नॉर्वेत आहे आणि तिथले फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. नुकतेच तिने नॉर्वेत निसर्गरम्य वातावरणात पुष्पा २मधील अंगारो सा आणि एक लाजरान साजरा मुखडा या फ्युजन गाण्यावर रिल शूट केला आहे. यावेळी तिच्यासोबत आर्टिस्ट मॅनेजर ऋतुजा देशमुखदेखील थिरकताना दिसत आहे. त्यांच्या या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. 

सायलीच्या डान्सला नेटकऱ्यांची मिळतेय पसंतीसायली कांबळेच्या अंगारो सा गाण्यावरील रिलवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तिच्या या रिलवर नवरा धवलने फायरची इमोजी शेअर केली आहे. एका युजरने लिहिले की, प्रत्येक गायक नाचू शकत नाही, तुम्ही एक प्रकारचे आहात जिच्याकडे खूप टॅलेंट आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, दी, तू परफेक्ट गाते आणि नाचतेसही. 

वर्कफ्रंटसायली कांबळेला इंडियन आयडॉल १२ या कार्यक्रमातून चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने एका मराठी सिनेमासाठीही गाणे गायले. सध्या ती सोनी टेलिव्हिजनवरील सुपरस्टार सिंगर ३ या शोमधील बालकलाकार स्पर्धकांची मेंटॉर म्हणून पाहायला मिळत आहे. याशिवाय ती परदेशात गाण्याचे शोज करतानाही दिसते.

टॅग्स :इंडियन आयडॉलपुष्पाअल्लू अर्जुनरश्मिका मंदाना