छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉल १२चा विजेता, पवनदीप राजन(Pawandeep Rajan) आणि शोची उपविजेती अरुणिता कांजीलाल(Arunita Kanjilal) शो संपला असला तरी सातत्याने चर्चेत येत असतात. शो सुरू असताना ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. शो संपल्यानंतरही पवनदीप आणि अरूणिता बऱ्याचदा एकत्र दिसले आहेत. त्यामुळे ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. पवनदीप आणि अरुणिता यांनी अनेक गाण्यांना आपला आवाजदेखील दिला आहे. आता पुन्हा एकदा ही जोडी धमाल करण्यासाठी सज्ज झाली आहे. यावेळी त्यांनी आपल्या चाहत्यांना एक सरप्राईज दिले आहे.
पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांच्यामध्ये काहीतरी सुरू आहे आणि त्यांनी लग्न केले आहे, अशा चर्चांना मध्यंतरी उधाण आले होते. मात्र, दोघांनीही हे वृत्त फेटाळून लावले आहे. ही निव्वळ अफवा असल्याचे म्हटले होत. दोघांनीही अनेक मुलाखतींमध्ये हे स्पष्ट केले आहे की ते दोघेही फक्त चांगले मित्र आहेत. त्यांच्यामध्ये असे काहीही नाही. पण त्यांच्या चाहत्यांना त्या दोघांची जोडी कायमची असावी असे वाटते.आता दोघेही चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण करणार आहेत. रिअलमध्ये नाही तर रील लाइफमध्ये. पवनदीप आणि अरुणिता लवकरच साखरपुडा करताना दिसतील. दोघेही आपले एक नवीन गाणे रिलीज करणार आहेत, ज्यात दोघेही पहिल्यांदाच त्यांच्या सुरेल स्वरांसह अभिनय करताना दिसतील. 'मंजूर दिल' असे या गाण्याचे नाव असून त्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.
मंजूर दिल या गाण्याच्या टीझरमध्ये पहायला मिळते आहे की, पवनदीप अरुणिताला आपल्या मनातील गोष्ट सांगताना दिसतो आहे. पवन अरुणिताला म्हणतो, 'मी एक गोष्ट विचारु ...' यावर अरुणिता म्हणते, 'हो विचार ...' पवनदीप म्हणतो - 'साथ देशील ना मला'... त्यावर अरुणिता म्हणते 'नेहमी'... दोघांचे हे रोमँटिक गाणे २३ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.