छोट्या पडद्यावरील सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉल १२ (Indian Idol 12)मधील पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल ही जोडी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय ठरली. शो संपल्यानंतरही या जोडीची लोकप्रियता चाहत्यांमध्ये कायम आहे. ही जोडी प्रेक्षकांना खूप भावते आहे. हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा वारंवार ऐकायला मिळत असतात. आता पवनदीपने अरूणितासोबतच्या नात्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत.
पवनदीप राजनने म्हटले की, अरूणिता फक्त त्याची मैत्रिण आहे. दोघांमधील बॉण्डिंग खूप चांगली आहे आणि दोघे खूप जवळचे फ्रेंड आहेत. आमच्यात कोणतेच रोमँटिक कनेक्शन नाही आहे. तो पुढे म्हणाला की, खरे सांगू तर आम्ही सर्व स्पर्धकांना एकत्र इतका वेळ व्यतित केला आहे की आम्ही सगळे एकमेकांच्या जास्त क्लोज आलो आहोत.