Join us

Indian Idol 12: आता बास झालं ताई...! शन्मुखप्रियाचं गाणं ऐकून पुन्हा एकदा चाहत्यांची सटकली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2021 2:21 PM

Indian Idol 12: शन्मुखप्रिया पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर; शन्मुख प्रियाला का होतोय इतका विरोध?

ठळक मुद्देहिला बाहेर काढा, प्रत्येकवेळी तू गाण्यांचा असा सत्यानाश करू शकत नाही, असे काय काय नेटक-यांनी लिहिले.

‘इंडियन आयडल 12’ हा रिअ‍ॅलिटी सिंगींग शो सध्या या ना त्या कारणाने चर्चेत आहे. आता काय तर पुन्हा एकदा या शोवर टीका होतेय. एकीकडे अंजली गायकवाड हिला शो बाहेर केल्यामुळे चाहते संतापले आहेत. दुसरीकडे शन्मुखप्रिया  (Shanmukhapriya) हिच्या गाण्याला वैतागले आहेत. रविवारी टेलिकास्ट झालेल्या एनिसोडमुळे शन्मुखप्रिया पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. लोकांनी पुन्हा तिला बाहेर काढण्याची मागणी सोशल मीडियावर केली आहे. (Indian Idol 12 Shanmukhapriya again trolled)कालच्या एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) स्पेशल गेस्ट बनून् आल्या होत्या. शन्मुखप्रियाने यावेळी झीनत यांच्यावर चित्रीत ‘चुरा लिया है’ हे गाणे गायले आणि तिचे सादरीकरण बघून चाहते खवळले.

‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ हे गाणे ओरिजनली आशा भोसले यांनी गायले आहे. 1973 साली आलेल्या ‘यादों की बारात’ सिनेमातील हे गाणे सुपरडुपर हिट ठरले होते. आजही हे गाणे लोकप्रिय आहे. पण ‘इंडियन आयडल 12’मध्ये शन्मुखप्रियाने हे गाणे गायले आणि चाहत्यांचा जणू रसभंग झाला. मग काय, नेटक-यांनी शन्मुखला जबरदस्त ट्रोल केले. सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झालेत. 

बस करो दीदी हम नहीं जानना की तुम कितनी तेज चिल्ला सकती हो, अशा आशयाचे एक मीम्स शेअर करता एका युजरने शन्मुखची खिल्ली उडवली. शन्मुख गायला स्टेजवर येते तेव्हा माझा टीव्ही मी म्युट करते, असे एका युजरने लिहिले. हिला बाहेर काढा, प्रत्येकवेळी तू गाण्यांचा असा सत्यानाश करू शकत नाही, असे काय काय नेटक-यांनी लिहिले.

झीनत अमान यांनी दिला दिलासा

गेल्या काही आठवड्यांपासून शन्मुखप्रिया प्रचंड ट्रोल होतेय. या पार्श्वभूमीवर इंडियन आयडल 12 चा होस्ट आदित्यने झीनत अमान यांना एक प्रश्न विचारला. सध्या शनमुखावर खूपजण टीका करत आहे. याचा सामना तिने कसा करावा,असे तुम्हाला वाटते? असे त्याने विचारले. यावर झीनत यांनी शन्मुख प्रियाला टीकाकारांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. ‘शनमुखा तू अजिबात दु:खी होऊ नकोस, रडूही नकोस.  तू खास आहेस.  काही लोकांना टीकाच करता येते, त्यांचे तेच काम असते. त्यांच्याबद्दल अजिबात विचार करू नकोस. फक्त पुढे जात रहा...,’ असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :इंडियन आयडॉल