काय सांगता, इतक्या कोटी संपत्तीचा मालक आहे पवनदीप राजन,आकडा वाचून चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 03:15 PM2021-08-16T15:15:19+5:302021-08-16T15:16:10+5:30
इंडियन आयडल १२ सिझनच्या सुरुवातीपासूनच पवनदीपने आपल्या गायगीने सर्वांची मनं जिंकली.रेखापासून ते नीतू कपूर, सिद्धार्थ मल्होत्रापासून ते कियारा आडवाणी जवळपास सगळ्याच बड्या सेलिब्रेटींची त्याने पसंती मिळवली.
पवनदीप राजन हा Indian Idol 12 चा विजेता ठरला आहे. या सिझनचा तो सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धक ठरला होता. त्यामुळे तमाम चाहत्यांनाही पवनदीपनेच विजेता बनावे अशी प्रार्थना करत होते. अखेर रसिकांच्या भरघोस मतांनी पवनदीप विजयी ठरला. एक आलिशान कार आणि 25 लाख रुपये जिंकले आहेत.
आपल्या गायकीनेच नाही तर या सिझनचा विजेता बनत पवनदीपने पुन्हा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. पवनदीप हा सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय आहे. पहिल्या परफॉर्मन्सनंतर सगळ्यातजास्त फॉलोअर्सची संख्या असलेल्या पवनदीप हा एकमेव स्पर्धक होता.
'इंडियन आयडला १२' चा विजेता बनल्यानंतर सोशल मीडियावर पवनदीप ट्रेंड होत आहे. चाहते त्याच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात आता त्याची एकुण संपत्तीविषयीही चाहते सर्च करताना दिसत आहेत. काही न्युज पोर्टलनुसार पवनदीप हा अवघ्या २५ व्या वर्षीच ७ कोटींहून अधिक संपत्तीचा मालक आहे.
पवनदीपने इंडियन आयडलपूर्वीही रियलिटी शो वॉइस इंडिया हा शो जिंकला होता. या शोचा विजेता बनल्यानंतर पवनदीपला ट्रॉफीसोबत 50 लाख रूपये आणि एक ऑल्टो K10 कार जिंकली होती. या शोनंतर त्याचे आयुष्यच पालटले उत्तराखंडमध्ये गायक म्हणून त्या प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या शोने त्याला पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवून दिली.
२०१५ मध्ये आलेला हा शो त्यावेळी सुपरहिट ठरला होता.हा शो जिंकल्यानंतर पवनदीपला उत्तराखंडचा यूथ एंबेसेडरही बनला. त्याने काही शो करायला सुरुवात केली. या शोच्या माध्यामातूनही तो भलीमोठी रक्कम कमावतो इतकच काय तर काही लोकल ब्रंडच्या जाहीरातीही त्याने केले आहेत. हेच त्याचे मुख्य कमाईचे साधन आहे.पवनदीप हा वर्षाला २० लाख रुपयांची कमाई करतो असे बोलले जाते.
इंडियन आयडल १२ सिझनच्या सुरुवातीपासूनच पवनदीपने आपल्या गायगीने सर्वांची मनं जिंकली. रेखापासून ते नीतू कपूर, सिद्धार्थ मल्होत्रापासून ते कियारा आडवाणी जवळपास सगळ्याच बड्या सेलिब्रेटींची त्याने पसंती मिळवली. लहानपणापासूनच पवनदीपला गायनाची आवड होती. वडिल सुरेश राजन यांच्याकडून त्याने गायनाचे धडे गिरवले.