Join us

कोरोनाची लागण झाल्यानंतरही इंडियन आयडलमधील या स्पर्धकाने दिला परफॉर्मन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 17:00 IST

या कार्यक्रमातील एका स्पर्धकाला कोरोनाची लागण झाली असून त्याने या अवस्थेत देखील परफॉर्मन्स दिला आहे.

ठळक मुद्देपवनदीपला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता या कार्यक्रमातील इतर स्पर्धक, परीक्षक, निवेदक, क्रू मेंबर्सची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

इंडियन आयडलचा सूत्रसंचालक आदित्य नारायणला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती आणि आता त्याच्यानंतर या कार्यक्रमातील एका स्पर्धकाला कोरोनाची लागण झाली असून त्याने या अवस्थेत देखील परफॉर्मन्स दिला आहे.

इंडियन आयडलमधील पवनदीप राजनच्या आवाजाचे अनेक चाहते आहेत. पवनदीपला कोरोनाची लक्षण जाणवत असल्याने त्याने काही दिवसांपूर्वी स्वतःला आयसोलेट केले होते. त्याची कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली असून तो आराम करत आहे. पण असे असूनही आयसोलेशनमध्ये असताना देखील त्याने र्व्हच्युअली परफॉर्मन्स दिला.

पवनदीपला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता या कार्यक्रमातील इतर स्पर्धक, परीक्षक, निवेदक, क्रू मेंबर्सची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्याचे अहवाल लवकरच मिळणार आहेत. अद्याप तरी कोणालाही कोरोनाची कोणतीही लक्षणं जाणवत नसल्याचे कळतेय. 

आदित्य नारायणने त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर याची माहिती सोशल मीडियाद्वारे  दिली होती. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याने लिहिले होते की, माझी पत्नी श्वेता आणि माझी चाचणी पॉझिटीव्ह आली असून दोघेही सध्या उपचार घेत आहोत. आम्ही सध्या तरी घरीच क्वारंटाइन आहोत. दोघेही स्वतःची सर्व काळजी घेत असून सर्व नियमांचं पालन करत आहोत. आम्ही लवकरच यातून बरे होऊ, आमच्यासाठी प्रार्थना करा.

टॅग्स :इंडियन आयडॉल