Join us

म्हणून इंडियन आयडॉलमधील 'हे' चार स्पर्धक आले एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 20:30 IST

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी विघ्नहर्ता गणेश हे एक आहे. मालिकेत आगामी एपिसोडमध्ये आपल्याला इंडियन आयडॉल 10च्या स्पर्धकांनी गायलेले ट्रॅक ऐकायला मिळणार आहे.

ठळक मुद्देइंडियन आयडॉल 10 विजेता सलमान अली,नीलजाना, नितिन आणि अंकुश यांचे हे पहिले व्यवसायिक गाणं आहे

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी विघ्नहर्ता गणेश हे एक आहे. आगामी एपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे की, दुग्मासुर याने चार वेदांची चोरी कशी केली आहे. इंडियन आयडॉल 10 विजेता सलमान अली,नीलजाना, नितिन आणि अंकुश यांच्या सह गणेशसाठी वेदांवर विशेष ट्रॅक रेकॉर्ड करण्यासाठी त्यांचा अप्रतिम आवाज त्यांनी दिला आहे. इंडियन आयडॉल 10  नंतर, या चार गायकांनी गायलेले  हे पहिले व्यावसायिक रेकॉर्डिंग आहे. या रेकॉर्डिंगसाठी सर्व चार जण उत्सुक होते कारण त्यांना गणेशसाठी त्यांचा पहिला व्यावसायिक ट्रॅक रेकॉर्ड करणे अधिक शुभ वाटते. 

या विषयी बोलताना अंकुश भारद्वाज म्हणाला, "विघ्नहार्त गणेश गाणे गाताना आम्हाला खरोखरच आशीर्वाद मिळाल्यासारखा वाटतो आहे. रेकॉर्डिंग दरम्यान वातावरण खूप सकारात्मक आणि ऊर्जा पूर्ण होते. आम्ही वेदांमधील श्लोकांचे पहिल्यांदा गायन करत होतो आणि तो एक वेगळे अनुभव होता. "

शोमध्ये देवी पार्वतीची भूमिका साकारत असलेली आकांशा पुरी म्हणाली, "मी खूप उत्साहित आहे कारण माझ्या आवडत्या गायक सलमान, अंकुश, नीलंजना आणि नितिन यांनी आमच्या शोसाठी रेकॉर्ड केले आहे. मी नेहमी आयडॉलची चाहती होते. ते सर्व अत्यंत प्रतिभावान आहेत आणि मला खात्री आहे की त्यांनी या ट्रॅकला आपल्या आवाजाने न्याय दिला असेल." 

टॅग्स :विघ्नहर्ता गणेशइंडियन आयडॉल