सुमारे 18 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ‘इंडियन आयडल’ या सींगिंग रिअॅलिटी शोने अनेक नव्या गायकांना संधी दिली. अनेकांच्या आयुष्याचं सोनं केलं. या शोची आधी एक वेगळीच क्रेझ होती. पण गेल्या काही वर्षांत बरंच काही बदललं आहे. केवळ जसेसच नाही तर आणखीही बऱ्याच गोष्टी बदलल्या. गेल्या काही सीझनपासून हा शो स्क्रिप्टेड असल्याचे आरोप होऊ लागले. सध्या ‘इंडियन आयडल’चा 13 वा सीझन (Indian Idol Season 13) सुरू झाला आहे आणि ऑडिशननंतर या सीझनचे टॉप 15 कंटेस्टंट्सही फायनल झाले आहेत. आता शो नव्या दमानं सुरू होईल. अर्थात त्याआधीच हा शो वादात सापडला आहे आणि याचं कारण आहे अरूणाचलचा रीतो रीबा. आता हे काय प्रकरण आहे, हे जाणून घेऊ यात.
तर सोनी टीव्हीने काही तासांपूर्वी ‘इंडियन आयडल 13’च्या टॉप 15 स्पर्धकांची यादी जारी केली. या यादीत ऋषी सिंह, शिवम सिंह, बिदिप्ता चक्रवर्ती, सोनाक्षी कर, नवदीप वडाली, सेनजुति दास, चिराग कोतवाल, प्रीतम रॉय, विनीत सिंह, शगुन पाठक, अनुष्का पटरा, देबोष्मिता रॉय, काव्या लिमाय, संचारी सेनगुप्ता व रूपम यांची नावं आहेत. ही यादी बघताच सोशल मीडिया युजर्सचा पारा चढला. होय, या यादीत रीतो रीबाचं नाव नाही, हे पाहून लोक संतापले. सोशल मीडियावर सध्या रीतो रीबा याचीच चर्चा आहे.
रीतो रीबाला का निवडलं नाही? त्याला का सिलेक्ट केलं नाही? असा सवाल युजर्स विचारत आहेत. काही लोकांनी ‘इंडियन आयडल 13’ हा शो स्क्रिप्टेड असल्याचा आरोपही केला आहे. रीतो रीबासारख्या टॅलेंटेड सिंगरला सिलेक्ट केलं नाही, हा शो स्कॅम आहे, असं म्हणत लोकांनी ‘इंडियन आयडल 13’ला ट्रोल केलं.
कोण आहे रीतो रीबा?रीतो रीबा हा अरूणाचलचा आहे. सिंगर असण्यासोबतच तो एक कंपोझरही आहे. जज हिमेश रेशमिया याने रीतोला त्याने कम्पोझ केलेलं गाणं ऐकवण्याची विनंती केली होती. रीतोचं गाणं चाहत्यांना प्रचंड आवडलं होतं. रीतोचं स्वत:चं एक युट्युब चॅनल आहे. यावर त्याने गाण्याचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. त्याने 241 K सब्सक्राइर्ब्स आहेत.