Join us

Video: "सूर्यवंशम सिनेमात ती खीर.."; कॉमेडियन समय रैनाने घेतली अमिताभ बच्चन यांची फिरकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 13:39 IST

KBC 16 च्या मंचावर भारतातील प्रसिद्ध कॉमेडियन कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी समय रैना आणि अमिताभ यांच्यातील मजेशीर संवाद व्हायरल झालाय

समय रैना हा कॉमेडियन सध्या चांगलाच चर्चेत आहे. 'इंडियाज गॉट लेटेन्ट' या सुप्रसिद्ध शोमुळे समयची सध्या चांगलीच हवा आहे. युवा पिढीतील अनेक नव्या टॅलेंट्सना समय सर्वांसमोर आणत आहे. समयचा सेन्स ऑफ ह्यूमर कमालीचा ग्रेट आहे. याचा प्रत्यय समयच्या फॅन्सला आला आहेच. पण आता समयच्या याच विनोदबुद्धीचा अनुभव चक्क बिग बींना आलाय. जेव्हा समय KBC 16 च्या मंचावर उपस्थित राहिला.

समयने घेतली अमिताभ यांची फिरकी

समय रैनाने KBC 16 च्या मंचावर अमिताभ यांची फिरकी घेतली. तो बिग बींना म्हणाला की, "मी तुमचा पहिला सिनेमा पाहिला तो होता सूर्यवंशम. मी तुमचा दुसरा सिनेमा पाहिला तो सूर्यवंशम. मी तुमचा तिसरा सिनेमा पाहिला तो सुद्धा सूर्यवंशमच होता. कारण सेट मॅक्सवर हा सिनेमा वारंवार दाखवला जायचा. जर तुम्हाला माहित होतं की, तुम्ही जी खीर खाताय त्यात विष आहे तर तुम्ही ती खीर का खाल्ली?" समयचा हा प्रश्न ऐकताच बिग बींना सुद्धा हसू आवरलं नाही.

तुमची प्रॉपर्टी माझ्या नावावर करा

याच एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन त्यांचा गाजलेला डायलॉग रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है, नाम है शहनशाह म्हणताना दिसतात. हे ऐकताच समय त्यांना म्हणतो की, "तुम्ही जर मला तुमचा मुलगा मानलं आहेच तर तुमच्या प्रॉपर्टीमध्ये मलाही वाटा द्या." हे ऐकताच बिग बी पुन्हा खळखळून हसायला लागतात. KBC 16 च्या या खास एपिसोडमध्ये समय रैना, तन्मय भट, भुवन बाम आणि इतर कॉमेडियन कलाकार सहभागी होणार आहेत. हा खास एपिसोड तुम्हाला ३१ जानेवारीला सोनी टीव्हीवर बघायला मिळेल.

 

टॅग्स :अमिताभ बच्चनकौन बनेगा करोडपतीटेलिव्हिजन