Join us

'मन उडू उडू झालं' मालिकेचा शेवटचा सीन करताना इंद्रा झाला भावुक, व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 2:51 PM

Man Man Udu Udu Jhala: मन उडू उडू झालं मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

मन उडू उडू झालं मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकतेच मालिकेच्या सेटवरील असे काही व्हिडीओ समोर आले आहेत की ज्यातून असा अंदाज वर्तवला जात आहे. मालिकेतील काही कलाकारांनी नुकताच निरोप घेतला आहे. मालिका संपणार की काय अशी चर्चा सुरू असताना मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात बँकेतील एक सीन शूट करताना यातील कलाकार दिसत आहेत.

मालिकेच्या सेटवरील समोर आलेल्या या व्हिडिओत इंद्रा-दीपूला सोनटक्के सर बेस्ट कपलचा पुरस्कार देतात. त्यावेळी अजिंक्य म्हणतो की, 'आमचा शेवटचा दिवस आहे बँकेच्या शूटचा. आम्ही शेवटच्या दिवशी शेवटचा सीन शूट करतोय'. यावेळी खूप भावुक झाल्याचं इंद्रा म्हणतो आहे. तर इंद्रा त्याच्या स्टाईलमध्ये सोनटक्के सरांना धमकीही देतो. पण आता हे शूटिंग मालिकेच्या शेवटच्या भागाचे आहे की बँकेमध्ये शूट होणाऱ्या शेवटच्या सीनचे आहे, याबाबत अद्याप काहीही समजू शकलेले आलेली नाही.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडीओमध्ये दीपूची भूमिका साकारणारी हृता दिसत नाही. त्यामुळे मालिका संपणार आहे की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

अजिंक्य राऊतने काही भावुक करणाऱ्या पोस्ट त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. दीपूसह फ्लॅशबॅक व्हिडीओ त्याने पोस्ट केला आहे. त्याने आणखी एक व्हिडीओ शेअर करत 'इंद्रदीपवर प्रेम करण्यासाठी धन्यवाद' अशी पोस्ट केली आहे.

अभिनेत्री पूर्णिमा तळवलकर यांच्यासह एक व्हिडीओ पोस्ट करत अजिंक्यने त्यांचेही आभार मानले आहे. अजिंक्यने सर्वांचे आभार मानणारे हे व्हिडिओज पाहता मालिका लवकरच निरोप घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :झी मराठी