कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिकेत विठूच्या वाडीत सध्या गोपाळच्या अनुपस्थितीमुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. पप्याच्या खोलीत राहण्यास नकार देणाऱ्या गोपाळला इंदूने क्रिकेटच्या सामन्यासाठी आव्हान दिलं आहे आणि हरल्यास त्याला इंदूचं म्हणणं ऐकावं लागेल. गोपाळ हे आव्हान स्वीकारतो आणि आता सामन्यात काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. जिथे तीन मित्रांची मैत्री अजून घट्ट होताना दिसतेय, तिकडे आनंदी अधूच्या आयुष्यातला एक मोठा निर्णय घेताना दिसणार आहे. ह्या निर्णयाचा ह्या तिघांच्या मैत्रीवर काय परिणाम होईल हे पाहणं रंजक ठरणार आहे.
इंदूने गोपाळला सामन्यासाठी आव्हान दिल्यावर आता अधू तिच्या बाजूने खेळायला सज्ज झालाय.इंदूला जिंकवण्यासाठी अधू काहीही करेल हे त्याने स्पष्ट केलंय.म्हणूनच हा सामना आणि या सामन्याचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता वाढत चालली आहे. पुढे काय होणार जाणून घेण्यासाठी बघा - ‘इंद्रायणी’, 5 एप्रिल, संध्या. 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर.
गोपाळला घरी परत आणण्यासाठी इंदू त्याला चॅलेंज देताना दिसणार आहे जर ती match जिंकली तर त्याला ती सांगेल ते ऐकावं लागेल. आता मालिकेत रंगणार आहे अटीतटीचा सामना गोपाळ VS इंदू. गोपाळला विठूच्या वाडीत परत आणण्यासाठी इंदू आणि अधूचा प्लॅन यशस्वी होईल का ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. इंद्रायणी मालिका दररोज संध्याकाळी ५ वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळत आहे.