Join us  

'इंद्रायणी'मधील भावुक सीन पाहून संतोष जुवेकरला चाहता म्हणतो- 'अभिनय म्हणता येणार नाही तर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 11:31 AM

संतोष जुवेकरला 'इंद्रायणी' मालिकेतील त्याच्या अभिनयासाठी चाहत्याकडून मिळालेली विशेष प्रतिक्रिया चर्चेत आहे (santosh juvekar, indrayani)

 मराठी कलाकार मालिका, सिनेमे, नाटकविश्वात सहजरित्या वावरत असतात. विविध माध्यमांत काम करत असल्याने मराठी कलाकार प्रेक्षकांचे लाडके असतात. आपल्या आवडत्या कलाकाराचं काम आवडलं की चाहतेही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसतात. असाच अनुभव अभिनेता संतोष जुवेकरला आलाय. संतोष सध्या 'इंद्रायणी' मालिकेत काम करतोय. या मालिकेतील संतोषने एका सीनमध्ये केलेल्या कमाल अभिनयाने त्याच्या चाहत्याने त्याला एक कॉम्प्लिमेंट दिलीय.

इंद्रायणी मधील या सीनला मिळाला कौतुकाचा वर्षाव

संतोषने 'इंद्रायणी' मालिकेतील एका सीनचा व्हिडीओ पोस्ट करुन त्याखाली कॅप्शन लिहिलंय की, "काल मला कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिकेतील माझ्या "विठू पंढरपूरकर" ह्या भूमिकेसाठी एक कंमेंट आली खरं तर ती compliment आहे पण माझ्यासाठी ती माझ्या कामाला मिळालेली मी पोचपावती आणि माऊलींचा आशिर्वाद मानतो. आभार मानणार नाही पण तुम्हां सर्वांचं प्रेम आणि आशिर्वाद कायम असेच सोबत असूदेत हीच माऊलींन चरणी प्रार्थना. राम कृष्ण हरी. ती complimented आणि तो सिन इथे तुम्हासोबत share करतोय."

संतोषला मिळालेली कॉम्प्लिमेंट

संतोषने पुढे त्याला आलेल्या कॉम्प्लिमेंटबद्दल सांगितलं की, "प्रति संतोष, कलर्स मराठी वाहिनीवर सध्या सुरु असलेल्या मालिकेत आपण विठू पंढरपूरकर ही भुमिका साकारत आहात त्यातील 75व्या भागात विठू व इंद्रायणी एकमेकांना घास भरवताना जेव्हा विठू म्हणतो 'पोरी मला बी रडवलंस' हा संवाद म्हणताना 5-10 सेकंद पुढे व मागे तुम्ही खरोखर रडल्याचं जाणवतं (expression) म्हणजे तो अभिनय नाही तर ती भूमिका जगणं होतं. मी तर त्या 75व्या भागातील तेवढा काही सेकंदाचाभाग पुनः पुन्हा पाहतो. विशेषतः तुमच्यावर समोरुन कॅमेरा असताना तुमचे संवाद नसतानाचे चेहऱ्यावरील भाव अश्रूंसह हे केवळ आणि केवळ नैसर्गिक होते त्याला अभिनय म्हणताच येणार नाही."

टॅग्स :संतोष जुवेकरकलर्स मराठीमराठीमराठी अभिनेता