'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मध्ये रंजक वळण, नेत्रा शेखरला वाचवण्यात यशस्वी होईल का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 03:21 PM2024-11-29T15:21:29+5:302024-11-29T15:22:58+5:30

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satvi Mulgi) मालिकेत मनोरंजक वळण घेत आहे.

Interesting twist in 'Satvya Mulichi Satvi Mulgi', Will Netra succeed in saving Shekhar? | 'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मध्ये रंजक वळण, नेत्रा शेखरला वाचवण्यात यशस्वी होईल का?

'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मध्ये रंजक वळण, नेत्रा शेखरला वाचवण्यात यशस्वी होईल का?

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satvi Mulgi) मालिकेत मनोरंजक वळण घेत आहे. सध्या मेघना अद्वैतच्या आयुष्यात त्याची सेक्रेटरी म्हणून प्रवेश करते, सतत त्याच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करते. दरम्यान, बंटी, ज्याला शतग्रीव म्हणूनही ओळखले जाते, त्याने ठरवले की तो आता शाळेत जाणार नाही. शेखरच्या परत आल्याने नेत्राला खूप आनंद होतो आणि ती त्याच्या स्वागताची तयारी करू लागली. तथापि, केदार नेत्राला धमकी देतो की तो शेखरला इजा करेल.

आता नेत्रा  शेखरला वाचवण्यासाठी घराबाहेर पडते. यादरम्यान, केदार नेत्राच्या परिस्थितीचा व्हिडिओ मैत्रीला पाठवतो. मैत्री गोंधळून जाते, तिला ठरवता येत नाही की तिने घर सोडावं की नाही. अखेरीस ती घर सोडते, आणि केदार आपल्या उद्देशानुसार तिला मारण्यासाठी पुढे सरसावतो. मात्र, केदारच्या हल्ल्यातून मैत्री वाचते. त्याचवेळी नेत्रा  शेखरला सुखरूप घरी परत आणते. 


घरी आल्यावर केदार शेखरला धमकावतो आणि काही महत्त्वाची माहिती त्याच्याकडून काढून घेतो. पण नेत्रा आधीच केदारच्या कृत्यांचे व्हिडीओ क्लिप्स रेकॉर्ड करून ठेवते. नेत्रा त्या क्लिप्स केदारला दाखवते आणि त्याला इशारा देते की ती त्या कुटुंबासमोर उघड करेल, ज्यामुळे केदारचे सत्य समोर येईल. नेत्राच्या  या धमकीमुळे केदारला आपल्या केलेल्या गोष्टी सुधारण्यास भाग पाडले जाते. नेत्रा त्या व्हिडीओ क्लिप्सचा वापर करून सर्व काही ठीक करण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी तिच्या धाडसामुळे परिस्थिती हळूहळू सुधारू लागते. नेत्रा शेखरला वाचवण्यात यशस्वी होईल का? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: Interesting twist in 'Satvya Mulichi Satvi Mulgi', Will Netra succeed in saving Shekhar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.