Join us  

'शिवा' मालिकेत रंजक वळण, सिताई देणार शिवाला ही शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 6:22 PM

'शिवा' मालिका (Shiva Serial) सुरूवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. मालिकेत रोज काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहे.

'शिवा' मालिका (Shiva Serial) सुरूवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. मालिकेत रोज काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहे. वस्तीत दहीहंडी साजरी करून शिवा आणि आशू घरी येतात. आशु, शिवाचा जीव वाचवून तिला घरी आणतो. पण घरी येताच सिताई शिवाला शिक्षा देते आणि घरातील गाड्या आणि अंगण स्वच्छ करायला लावते.

शिवा वस्तीत जाऊन पुन्हा आपल्या शिवा कपड्यांमध्ये येऊन दहीहंडी फोडते म्हणून सिताई  शिवाशी अबोला धरते. शिवाचे सीताईला मनवायचे सगळे प्रयत्न सुरु आहेत. शिवा डोसा बनवते आणि त्याच्यावर चटणीने सॉरी लिहते. सिताईला हे आवडत नाही. शिवा असे कपडे इथुन पुढें कधीचं घालणार नाही असे वचन सिताईला देते. शिवा सिताईबरोबर भाजी मार्केट मध्ये जाते तेव्हा तेथील व्यापारी गुंड हप्तावसुली करत असल्याचं शिवाला कळत. शिवा सिताईच्या नजरेत न येता गुंडांना धडा शिकवते.

वस्तीतील शाळेची पडझड झाल्याने शाळा बंद पडणार आहे हे जेव्हा  शिवा कळत ती शाळेची मदत करायची ठरवते. शिवाला मदत करताना पाहून,  आशू शिवाला मदत करायची ठरवतो. या सगळ्यामुळे शिवा आणि सिताईच्या नात्यात गोडवा येईल? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.  

टॅग्स :झी मराठी