Join us

Interview : सलमान अली म्हणतो, मेरी गरीबी दूर हो जाऐगी....!  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 11:36 AM

‘इंडियन आयडॉल 10’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर सलमान अलीने ‘लोकमत’शी खास संवाद साधला... या संवादाचा हा सारांश...

- रूपाली मुधोळकर

प्रतिकूल परिस्थितीशी चार हात करत, रोज छळणाºया गरिबीला हरवत ‘इंडियन आयडॉल 10’च्या ट्रॉफीवर नाव कोरणा-या सलमान अलीच्या आवाजाने अनेकांना मंत्रमुग्ध केले. काल रंगलेल्या ‘इंडियन आयडॉल 10’च्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये विजेता म्हणून सलमानच्या नावाचा पुकारा झाला आणि सलमानसह त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. ‘इंडियन आयडॉल 10’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर सलमान अलीने ‘लोकमत’शी खास संवाद साधला... या संवादाचा हा सारांश...

प्रश्न- सलमान, आप छा गये हो! ‘इंडियन आयडॉल 10’ जिंकल्यानंतर काय वाटतेय?सलमान - मी खूप आनंदात आहे. जनतेकडून, चाहत्यांकडून, ‘इंडियन आयडॉल 10’च्या अख्ख्या फॅमिलीकडून मिळालेले पे्रम पाहून मी भारावलो आहे. आयुष्यात याची परतफेड मी कधीच करू शकणार नाही. हा क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे. या क्षणी मला मनातून केवळ आणि केवळ सर्वांचे आभार मानायचे आहेत.  

प्रश्न- ‘इंडियन आयडॉल 10’च्या अख्ख्या सीझनमध्ये तुझ्या कुटुंबाचा उल्लेख झाला. या विजयानंतर कुटुंबासाठी सगळ्यांत आधी काय करशील?सलमान- माझ्या हातातली ही ट्रॉफी त्यांच्या पायांवर ठेवेल. माझ्या कुटुंबामुळेचं मी इथवर पोहोचलो. हा विजय, हा क्षण माझ्या इतकाच त्यांचा आहे.  प्रश्न - ‘इंडियन आयडॉल 10’ जिंकल्यानंतर आयुष्यात काय बदल होईल, असे तुला जाणवतेय.सलमान- मेरी गरीबी दूर हो जाऐगी, मॅम. मी खूप हालअपेष्ठा सहन केल्यात. खूप काही सोसले. यानंतर माझी गरिबी दूर होईल, असे मला वाटते.

प्रश्न- संघर्षाने तुला कुठली एक गोष्ट शिकवली?सलमान - खूप संघर्ष केला. या संघर्षाने मला जिंकायला शिकवले. काहीही झाले तरी हार मानायची नाही, हे शिकवले. मला माणूस म्हणून, कलाकार म्हणून जगायला शिकवले.

प्रश्न - तू एका मोठ्या रिअ‍ॅलिटी शोचा विजेता आहे. रिअ‍ॅलिटी शो कलाकार घडवतात, हेही आपण पाहिलेय. पण रिअ‍ॅलिटी शोबद्दल एक नकारात्मक मतही आहे. तू याबद्दल काय सांगशील?सलमान - एक रिअ‍ॅलिटी शो मी अनुभवला आहे आणि या सुंदर अनुभवावरून एकच सांगेल की, रिअ‍ॅलिटी शो एक ‘रिअ‍ॅलिटी’ आहे. माझ्यासारख्या अनेकांनी अशा रिअ‍ॅलिटी शोमध्ये यावे, असेच मी म्हणेल.

प्रश्न - ‘इंडियन आयडॉल 10’च्या या अख्खा प्रवासातून काय सोबत घेऊन जाशील?सलमान- खूप सारे मित्र आणि प्रेम. नितीनसारखा मित्र मला या शोने दिला. आम्ही सर्वजण स्पर्धक नव्हतो तर कुटुंब होता. या कुटुंबाचे प्रेम माझ्यासोबत असेल.

प्रश्न- तुझा यानंतरंचा प्लान काय असणार आहे?सलमान - सर्वप्रथम मला मुंबईला शिफ्ट व्हायचे आहे. मुंबईत आल्यानंतर बॉलिवूडमध्ये संधी मिळावी, यासाठी मी सर्वातआधी प्रयत्न करेल.  

 

टॅग्स :इंडियन आयडॉल