Join us

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिका रंजक वळणावर, जयदीप देणार मानसीसोबत लग्न करायला होकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 11:16 AM

Sukh Mhanje Nakki Kay Asata: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकांपैकी सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asata) मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. जयदीपने गौरीला कड्यावरून ढकलले होते. त्यानंतर माईंच्या साथीने गौरी शालिनी, मानसी आणि जयदीपला धडा शिकवण्यासाठी स्मरणशक्ती गेल्याचा बनाव करुन घरात परतली आहे. आता ती शालिनी आणि देवकी चांगलाच धडा शिकवताना दिसते आहे. दरम्यान आता मालिकेत धक्कादायक वळणावर आली आहे. जयदीप मानसीसोबत लग्न करायला होकार देतो. 

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. यात पाहायला मिळत आहे की, घरातील सर्व जण हॉलमध्ये एकत्र बसले आहेत. त्यावेळी मानसीची आई बोलते की नंदिनीने मला वचन दिले होते. जयदीपशी मानसीचे लग्न लावून देईन. तेव्हा शालिनी त्यांना म्हणते थांबा जरा. जयदीप भावोजी तुम्हाला जर हे लग्न मान्य असेल तर जाऊन मानसीचा हात पकडा. त्यानंतर जयदीप उठून मानसीचा हात पकडतो. याचा अर्थ त्याला हे लग्न मान्य आहे. हे पाहून घरातील इतरांना धक्का बसतो. आता मानसीचा हात पकडणारा हा जयदीप खरा आहे की सोंग घेतलेला अनिल आहे, हे आगामी भागात समजेल. आता गौरी आणि माई काय करणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

शालिनीचा प्लान फसतोनुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात शालिनी घरात असलेली गौरीच आपली गौरी असल्याचं सर्वांना सांगते. मात्र ते स्वीकारायला कुणीच तयार नसते. त्यानंतर ती माईंना तिच्या डोक्यावर हात ठेवून मान्य करायला सांगते की ही आपली गौरी नाही असे सांगा. पण माई तसे करत नाहीत. त्या सांगतात की जर मी आता म्हणेण ही आपली गौरी नाही. पण जर तिची स्मरणशक्ती खरोखर गेली असेल आणि नंतर परत आली तर हे चुकीचं घडेल. यावर घरातील सर्व माईंना सपोर्ट करतात. त्यामुळे शालिनीचा गौरीचा पर्दाफाश करण्याचा प्लान फसतो.

टॅग्स :स्टार प्रवाह