शंकर महादेवन यांनी रायझिंग स्टार २ मधील सागर म्हात्रेला दिले हे निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2018 11:02 AM
रायझिंग स्टार या कार्यक्रमाच्या यशानंतर रायझिंग स्टार २ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या कार्यक्रमात शंकर महादेवन, दिलजित ...
रायझिंग स्टार या कार्यक्रमाच्या यशानंतर रायझिंग स्टार २ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या कार्यक्रमात शंकर महादेवन, दिलजित दोसांझ आणि मोनाली ठाकूर परीक्षकाच्या भूमिकेत झळकत आहेत. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक एकाहून एक सरस परफॉर्मन्स सादर करत आहेत. गायनाचा हा लाइव्ह रिअॅलिटी शो असून उठाओ सोच की दीवार या संकल्पनेतून समाजातील अडथळे मोडून टाकण्यासाठी आणि सामान्य लोकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हा कार्यक्रम प्रयत्न करत आहे. रायझिंग स्टार २ या कार्यक्रमात टॅलेंटेड आणि प्रेरणादायी स्पर्धक प्रत्येक एपिसोडमध्ये त्यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या कार्यक्रमातील अनेक स्पर्धक हे अतिशय सामान्य कुटुंबातून आले आहेत. या कार्यक्रमातील सागर म्हात्रे हा स्पर्धक केवळ २० वर्षांचा आहे. त्याचा आवाज हा खूप चांगला असून संगीत हे त्याच्यासाठी सर्वस्व आहे. तो गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक मुलांना संगीत मोफत शिकवत आहे. आपल्याकडे असलेले ज्ञान इतरांना दिले पाहिजे असे त्याचे म्हणणे आहे. त्याला या कार्यक्रमात नुकतीच शंकर महादेवन यांनी एक ऑफर दिली. रायझिंग स्टार २च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये सागर म्हात्रेने दिल की तपीश हे गाणे गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्याच्या हृद्यस्पर्शी गाण्यामुळे परीक्षक आणि तज्ज्ञांनी उभे राहून त्याला मानवंदना दिली. इतक्या तरुण वयात, इतके अवघड अभिजात गाणे म्हणणे अनुभवी निष्णातांना सुद्धा अवघड जाते, पण त्याने ते सहजपणे म्हटल्यामुळे त्याला कार्यक्रमातील प्रसिद्ध तुतारी क्षण सुद्धा मिळाला. या तरुण मुलाच्या या पराक्रमामुळे त्याच्या आईवडिलांना अतिशय अभिमान वाटला आणि ते त्यांच्या डोळ्यातील आनंदाचे अश्रू रोखू शकले नाहीत. लाखमोलाचा क्षण सागरसाठी यानंतर आला जेव्हा शंकर महादेवन यांनी त्याला सांगितले की, तो त्यांच्या संस्थेत लहान मुलांना शिकवू शकतो. शंकर महादेवन यांसारख्या महान गायकाने ही गोष्ट सांगितल्यामुळे तो प्रचंड खूश झाला होता. Read : शंकर महादेवन यांनी सोहमला दिले हे वचन