Join us

अंकिता लोखंडे होणार आई? बिग बॉसच्या घरात केला प्रेग्नंसीविषयी मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 15:06 IST

Ankita lokhande: बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी घटना

छोट्या पडद्यावर अलिकडेच बिग बॉसचं १७ वं पर्व सुरु झालं आहे.  हे पर्व सुरु झाल्यापासून ते वेगवेगळ्या कारणामुळे ते चर्चेत येत आहे. यात खासकरुन अभिनेत्री अंकिता लोखंडे (ankita lokhande) आणि विकी जैन (vicky jain) ही जोडी प्रेक्षकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. सोशल मीडियावर एकमेकांप्रतीचं प्रेम व्यक्त करणारी ही जोडी या कार्यक्रमात सहभागी झाल्यापासून सतत एकमेकांसोबत भांडण करत आहेत. त्यामुळे त्याच्यातील या वादाची वरचेवर चर्चा होते. यामध्येच आता अंकिताविषयी एक मोठी माहिती समोर आली आहे. अंकिता लवकरच आई होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सध्या सोशल मीडियावर अंकिताचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती प्रेग्नंट असल्याची तिला शक्यता जाणवत आहे. इतकंच नाही तर तिने यासाठी दोन वेळा प्रेग्नंसी टेस्टही केली आहे. त्यामुळे अंकिता खरोखरच प्रेग्नंट आहे की काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. हा व्हिडीओ बिग बॉसच्या ऑफिशिअल पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

अंकिता खरोखरच प्रेग्नंट आहे?

"व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ क्लीपमध्ये अंकिता विकीसोबत तिच्या प्रेग्नंसीविषयी चर्चा करताना दिसत आहे. मला वाटतंय ही प्रेग्नंसीच आहे. बाकी तर काही नसेल. विचार करुन माझा जीव वर-खाली होतोय. मला काही तरी होतंय. मी फार कन्फ्यूज झाले आहे. मी तुला दोष देत नाहीये. मी कोणालाच काही बोलत नाहीये", असं अंकिता म्हणते.

पुढे ती म्हणते, "माझे पिरीअड्स पण वेळेवर आलेले नाहीत. अलिकडेच माझी युरीन टेस्ट झाली आहे ज्याचे रिपोर्ट्स येणं बाकी आहे. मला खूप टेन्शन आलंय. काय करावं कळत नाहीये."

दरम्यान, विकीसोबत बोलणं झाल्यानंतर तिने रिंकू धवनलादेखील याविषयी सांगितलं. त्यामुळे सध्या बिग बॉसच्या घरात अंकिताच्या प्रेग्नंसीची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे अंकिता जर खरंच प्रेग्नंट असेल तर बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडणार आहे.  

टॅग्स :अंकिता लोखंडेबिग बॉसटेलिव्हिजनसेलिब्रिटी