Join us

'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या प्रेमात आहे मोहम्मद सिराज? 'त्या' फोटोमुळे चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 11:05 IST

भारताचा स्टार क्रिकेटर मोहम्मद सिराज 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अभिनेत्रीची एक पोस्ट याचं कारण ठरली आहे. 

अनेक क्रिकेटर्स आणि अभिनेत्रींची नाव एकमेकांबरोबर याआधीही जोडली गेली आहेत. काहींनी अभिनेत्रींबरोबरच लग्न करत संसार थाटला आहे. त्यामुळे क्रिकेट आणि सिनेविश्वाचे जवळचे संबंध राहिलेले आहेत. आता एका नव्या सेलिब्रिटी जोडीची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. भारताचा स्टार क्रिकेटर मोहम्मद सिराज बिग बॉस फेम अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अभिनेत्रीची एक पोस्ट याचं कारण ठरली आहे. 

मोहम्मद सिराजचं नाव एका अभिनेत्रीबरोबर जोडलं जात आहे. ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे बिग बॉस फेम माहिरा शर्मा आहे. माहिराने काही दिवसांपूर्वी केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चा रंगल्या आहेत. माहिराने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा लेहेंगा घातला होता. बॅकलेस ब्लाऊजमधील तिच्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. माहिराच्या या फोटोंना मोहम्मद सिराजनेही लाइक केलं आहे. 

माहिराचे हे फोटो सिराजने लाइक केल्याने त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांनी तशा कमेंटही केल्या आहेत. सिराजने माहिराचे फोटो लाइक केल्याने या दोघांमध्ये काही सुरू आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

माहिराने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. नागिनमुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती. बिग बॉसमध्येही माहिरा सहभागी झाली होती. यारों का टशन, कुंडली भाग्य, बेपनाह प्यार या मालिकांमध्ये ती झळकली आहे. माहिरा अभिनेता पारस छाबडासोबत रिलेशनशिपमध्ये होती. ४ वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. ते दोघे लिव्ह इनमध्ये देखील राहत होते. मात्र नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. पारस छाबडानंतर आता माहिराचं नाव मोहम्मद सिराजसोबत जोडलं जात आहे.  

टॅग्स :मोहम्मद सिराजमाहिरा शर्माटिव्ही कलाकार