Join us

इशा अन् अनिश करणार पळून जाऊन लग्न; अरुंधती करेल का त्यांचा स्वीकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 18:29 IST

Aai kuthe kay karte: अरुंधतीसमोर आता नवं संकंट उभं राहिलं आहे.

छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येत आहेत. त्यामुळे ही मालिका दिवसेंदिवस रंजक वळणं घेत आहेत. ही मालिका सुरु झाल्यापासून अरुंधतीसमोर सतत कोणती ना कोणती संकंट उभी राहत आहेत. सध्या या मालिकेत इशाच्या लग्नावरुन नवा वाद सुरु झाला आहे. रागाच्या भरात इशा, अनिशसोबत पळून जाऊन लग्न करते. त्यामुळे अरुंधतीसमोर आता नवं संकंट उभं राहिलं आहे.

सध्या सोशल मीडियावर आई कुठे काय करते या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये इशा आणि अनिश पळून जाऊन लग्न करतात. आणि, थेट देशमुखांसमोर उभे राहतात. इशा आणि अनिशच्या लग्नाविषयी कळल्यानंतर घऱातले सगळेच थक्क होतात. तर, अनिरुद्ध इशाला घरातून हकलून देतो.

इशाने अनिशसोबत लग्न करु नये अशी अनिरुद्धची इच्छा असते. परंतु, इशा हट्टाला पेटते आणि ती अनिशसोबत लग्न करते. त्यामुळे अनिरुद्ध तिच्याशी असलेलं नातं कायमच संपवतो. त्यामुळे आता अरुंधतीचं या लग्नाविषयी काय मत आहे? अनिश आणि इशाच्या या नात्याचा ती स्वीकार करेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावर मिळणार आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनआई कुठे काय करते मालिकासेलिब्रिटी