Join us

​इशा गुप्तानंतर मंदना करिमी झाली टॉपलेस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 9:38 AM

इशा गुप्ताने रुस्तम, जन्नत 2, थ्री डी, चक्रव्युह, गोरी तेरे प्यार में, हमशक्लस, बेबी, में रहूँ या ना रहूँ, ...

इशा गुप्ताने रुस्तम, जन्नत 2, थ्री डी, चक्रव्युह, गोरी तेरे प्यार में, हमशक्लस, बेबी, में रहूँ या ना रहूँ, तुतक तुतक तुतिया यांसारख्या चित्रपटात काम केले असले तरी तिला तितकीशी प्रसिद्धी मिळाली नाही. पण सध्या एका वेगळ्याच कारणामुळे ती चर्चेत आहे. इशा गुप्ता गेल्या काही दिवसांपासून तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. या फोटोंची सध्या चांगलीच चर्चा आहे. तिने काही दिवसांपूर्वी तर तिचा एक अर्धनग्न फोटो देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. आता तिच्यानंतर मंदना करिनाने तिचा एक टॉपलेस फोटो शेअर केला आहे.बोल्ड फोटो पोस्ट केल्यामुळे तुम्ही चर्चेत येतात असे आता अभिनेत्रींना वाटत असल्याने त्या चर्चेत येण्यासाठी सध्या हा मार्ग अवलंबत आहेत असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. ईशा गुप्ता तिच्या फोटोंमुळे चांगलीच फेमस झाल्याने आता मंदनादेखील हाच मार्ग अवलंबवला आहे. तिने तिच्या टॉपलेस फोटोसोबत आणखी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तर तिचा खूपच जास्त बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. मंदना करिमी बिग बॉस या कार्यक्रमामुळे प्रकाशझोतात आली. या कार्यक्रमानंतर ती काही चित्रपटांमध्ये झळकली होती. सध्या ती तिच्या घटस्फोटाच्या प्रकरणामुळे चर्चेत आहे. तिचे काही महिन्यांपूर्वी गौरव गुप्तासोबत लग्न झाले होते. पण तिने गौरवविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. मात्र हे करत असलेले आरोप चुकीचे असल्याचा दावा एका वेबसाईटने केला होता. मंदना आता तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली असून तिच्या या फोटोंना अनेक लाईक्स आणि शेअर मिळत आहेत. Also Read : ​इशा गुप्ताने केले हॉट फोटोशूट