ईशा शर्मा ह्या मालिकेत दिसणार निगेटिव्ह भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 01:33 PM2018-08-02T13:33:38+5:302018-08-02T13:36:34+5:30

'सुपर सिस्टर्स' ही मालिका दोन बहिणीच्या नातेसंबंधावर आधारीत आहे.

Isha Sharma play negative role in Super Sisters Serial | ईशा शर्मा ह्या मालिकेत दिसणार निगेटिव्ह भूमिकेत

ईशा शर्मा ह्या मालिकेत दिसणार निगेटिव्ह भूमिकेत

googlenewsNext
ठळक मुद्देईशाची भूमिका तरूण मुलींना वाटेल जवळची 'सुपर सिस्टर्स' मालिका दोन बहिणींच्या नातेसंबंधावर आधारीत

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री ईशा आनंद शर्मा सोनी सब वाहिनीवरील  'सुपर सिस्टर्स' मालिकेत निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत ईशा ही व्यक्तिरेखा एक बुद्धी नसलेली सुंदर मुलगी आहे. तिच्या मते ती जगातली सगळ्यात सुंदर मुलगी आहे. ती नेहमीच तिच्‍या मेकअप व लुक्‍समध्‍ये गुंतलेली असते. तिला वाटते कोणताच मुलगा तिला नकार देऊ शकत नाही. ही नकारात्‍मक भूमिका असली तरी उत्‍साही, विनोदी आहे. प्रेक्षकांना ही नकारात्‍मक भूमिका आवडेल, अशी आशा ईशाने व्यक्त केली. 


'सुपर सिस्टर्स' ही मालिका दोन बहिणीच्या नातेसंबंधावर आधारीत आहे. या मालिकेत स्वतःच्या नावाची भूमिका साकारायला मिळाल्यामुळे ईशा शर्मा म्हणाली की, प्रत्येकाला आपल्याच नावाची भूमिका साकारण्‍याची संधी मिळत नाही. मला ही संधी मिळाल्‍याने मी स्‍वत:ला नशीबवान मानते. या भूमिकेला होकार देण्‍यामागील मुख्‍य  कारण म्‍हणजे ही नकारात्‍मक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडेल. नकारात्‍मक शब्‍दातून नकारात्‍मक प्रभाव पडतो, पण तुम्‍हाला या नकारात्‍मक भूमिकेचीही एक सकारात्‍मक बाजू पाहायला मिळणार आहे.
निगेटिव्ह भूमिकेबद्दल ती म्हणाली की, 'यापूर्वी नकारात्‍मक प्रतिमा दाखवणाऱ्या भूमिका साकारल्‍या आहेत. पण ही भूमिका नकारात्‍मक असली तरी त्‍यामध्‍ये निरागसता, चिडखोरपणा असण्‍यासोबतच मनोरंजन देखील आहे. अनेक तरुण मुली ईशा भूमिकेशी स्वत:ला जोडून घेऊ शकतील.'

ईशाला वाटते की प्रेक्षक पडद्यावरील व पडद्याबाहेरील ईशाच्‍या प्रेमात पडतील. या मालिकेत ड्रामा आहे, मनोरंजन आहे. शिवाय, सातत्याने यात काही रहस्य उलगडली जातील. यापेक्षा अधिक मी काही आता सांगू शकणार नाही. पण मला खात्री आहे प्रेक्षकांना ही मालिका खूप आवडेल, असे ईशा म्हणाली.

Web Title: Isha Sharma play negative role in Super Sisters Serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.