Join us

इश्कबाझ मालिकेच्या ट्रॅकला लागणार वेगळे वळण !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 10:17 AM

स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका इश्कबाझ आपल्या कथानकातील ओबेरॉय यांच्या आयुष्यातील नाट्‌यमय वळणांसह प्रेक्षकांना सातत्याने चकित करत आहे.

स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका इश्कबाझ आपल्या कथानकातील ओबेरॉय यांच्या आयुष्यातील नाट्‌यमय वळणांसह प्रेक्षकांना सातत्याने चकित करत आहे. ह्या मालिकेच्या सध्याच्या ट्रॅकमध्ये ओबेरॉय मेन्शनमध्ये झालेल्या खूनाचे रहस्य असून त्यानंतर शिवाय (नकुल मेहता) आणि अन्निका (सुरभि चंदना) यांच्या आयुष्यात कसे वादळ येते ते दाखवण्यात आले आहे. मोहित ऊर्फ झैन इमाम आणि नॅन्सी ऊर्फ मंदना करिमी यांचा प्रवेश ओबेरॉय यांच्या आयुष्यात झाल्याचे प्रेक्षकांनी अगोदरच पाहिले आहे पण आता पुढे काय होणार याची कल्पना कोणीच करू शकत नाही.

ह्या शो चे प्रेक्षक आणि चाहते यांच्या असे लक्षात येईल की हा ट्रॅक बॉलीवूड चित्रपट अजनबीशी अगदी मिळताजुळता आहे. निर्मात्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले, “निर्मात्यांना शिवाय आणि अन्निका यांच्या आयुष्यात एक वेगळेच वळण आणायचे होते, त्यामुळे मग त्यांनी बॉबी देओल, अक्षय कुमार, करीन कपूर आणि बिपाशा बासू यांच्या भूमिका असलेल्या अजनबी चित्रपटातून प्रेरणा घेतली. सध्याच्या ह्या ट्रॅकसह हा शो प्रेक्षकांना अगदी थक्क करेल आणि दररोज रात्री प्रेक्षक हा शो सुरू होण्याची मनापासून वाट पाहतील.” काय शिवाय आणि अन्निका यांचे आयुष्य कायमचे बदलून जाईल की ते आपल्या आयुष्यातील हा आणखी एक अडथळा पार करतील?

काही दिवसांपूर्वी या मालिकेत मोहित आणि नॅन्सी या दाम्पत्याचा ओबेरॉय कुटुंबियांच्या जीवनात प्रवेश झाला आहे. नॅन्सीची व्यक्तिरेखा रंगविणारी मंदना करिमी म्हणाली,“इश्कबाझ या टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिकेचा एक भाग बनता आल्यामुळे मी अतिशय आनंदात आहे. हिंदी मनोरंजन मालिकांमध्ये मी प्रथमच भूमिका साकारत असून मला ही भूमिका मिळाल्याबद्दल मी स्वत:ला अतिशय सुदैवी समजते. मालिकेत माझ्या पतीच्या भूमिकेत झेन इमाम आहे. तो एक अप्रतिम अभिनेता असून मला त्याच्याबरोबर एकत्र भूमिका साकारायची आहे, असं कळल्यावर मी खूपच उत्सुक झाले आहे. माझी नॅन्सीची व्यक्तिरेखा सुंदर आणि मादक असून मी माझ्या पतीवर निरतिशय प्रेम करते, असं दाखविण्यात आलं आहे. नॅन्सीचं हे मादक, फॅशनेबल व्यक्तिमत्त्व आणि तिच्या भूमिकेला असलेले विविध पदर बघून मी ही भूमिका स्वीकारली.”