Join us

'छोट्या गंगुबाई'ला आता ओळखणं झालंय कठीण, बोल्ड अदांनी वाढवलं इंटरनेटचं तापमान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 8:28 PM

Saloni Daini: चिमुरडी गंगुबाई आता २१ वर्षांची झाली आहे आणि ती खूपच ग्लॅमरस दिसते.

छोट्या पडद्यावर छोटी गंगुबाई या नावाने प्रचलित असलेली बालकलाकार सलोनी दैनी (Saloni Daini) आता खूपच वेगळी दिसते. आता तिला ओळखणे कठीण झाले आहे. सलोनी आता २१ वर्षांची झाली आहे. सलोनीने गेल्या १४ महिन्यात २२ किलो वजन कमी केले आहे आणि ती खूपच स्लीम अँड ट्रीम दिसते आहे. सलोनी दैनी खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आणि ग्लॅमरस असून तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना खूप भावतो आहे.

सलोनी दैनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे फोटो पाहून तिच्यावर लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होत असतो. नुकतेच तिने सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

सलोनी दैनीने २००८ साली 'छोटे मिया' या लहान मुलांच्या कॉमेडी शोमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या शोमध्ये ती गंगूबाई हे पात्र साकारायची. तिची ही व्यक्तिरेखा त्यावेळी खूप गाजली होती. आजही ती छोटी गंगूबाई म्हणूनच ओळखली जाते. त्यानंतर तिने 'रावी', 'नमुने', 'बडे भैया की दुल्हनिया', 'तेडी मेढी फॅमेली', यह जादू है जिन्न का’ या मालिकेत काम केले आहे.

टॅग्स :सलोनी डॅनी