Join us

यह उन दिनो की बात है या मालिकेतील आशी सिंग जपून ठेवणार मालिकेच्या या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 8:07 AM

शालेय दिवस हे मजा मस्तीत कधी निघून जातात हेच कळत नाहीत. शालेय दिवसांच्या आठवणी या प्रत्येकासाठी खास असतात. पण ...

शालेय दिवस हे मजा मस्तीत कधी निघून जातात हेच कळत नाहीत. शालेय दिवसांच्या आठवणी या प्रत्येकासाठी खास असतात. पण प्रत्येक विद्यार्थ्याला सर्वात जास्त तिरस्काराने शाळा आठवते ती गणेवेशामुळे. आपण सर्व सहमत आहोत की आपल्या पालकांना गणवेश आवडायचा. पण आपल्याला तो अजिबातच आवडायचा नाही. दररोज एकाच रंगाचे कपडे घालणे कोण पसंत करेल? सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या यह उन दिनो की बात है या मालिकेत आपल्याला ९०चा काळ पाहायला मिळत आहे. या मालिकेतील शालेय जीवनातील प्रेम कथा प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. यह उन दिनो की बात है या मालिकेत एक नवीन अध्याय सुरू होणार आहे आणि समीर (रणदीप राय) आणि नैना (आशी सिंह) हे महाविद्यालयात गेले असल्याचे दाखवण्यात येणार आहे. समीर आणि नैना दोघेही महाविद्यालयातील त्यांच्या पुढच्या भागांबद्दल उत्सुक आहेत. तर ​​नैनाची भूमिका साकारणारी आशी सिंग आपल्या हिरव्या आणि पांढऱ्या शाळेतील गणवेशाला खूप मिस करणार आहे. तिला शाळेच्या गणवेशाचा रंग इतका आवडला आहे की, तिने या मालिकेच्या निर्मात्यांना आणि या मालिकेच्या टीमला तिला एक जोड गणवेश देण्याची विनंती केली आहे. याविषयी आशी सिंग सांगते, "या मालिकेतील शाळेचे दिवस निःसंशयपणे मजेदार आणि सुखद होते. जीवन अनेक चिंतेशिवाय सोपे आहे हे या भूमिकेद्वारे मला कळले. या मालिकेमुळे मी अनेक आठवणी तयार केल्या आहेत. मी माझ्या खऱ्या शालेय दिवसात खूप मजा केली आणि भरपूर मित्र बनवले. माझ्या बऱ्याच मित्रांना गणवेश आवडायचाच नाही. पण ते माझ्या बाबतीत नव्हते. मला नेहमीच माझ्या शाळेचा गणवेश आवडत असे. केवळ माझ्या खऱ्या शाळेचाच नव्हे तर यह उन दिनो की बात है या मालिकेतील नैनाचा गणवेश देखील मला खूप आवडतो. त्यामुळे मला या आठवणी जतन करून ठेवायच्या आहेत. आता शाळेचे शूट संपत आहे. म्हणून मी प्रॉडक्शन टीमला माझ्यासाठी एक गणेवेशाचा जोड देण्यासाठी विनंती केली आणि त्यांनी आनंदाने सहमती दिली. "Also Read : यह उन दिनों की बात है या मालिकेतील रणदीप राय करणार अजय देवगणसारखा स्टंट