Join us

‘जादू तेरी नजर- डायन का मौसम’ मालिकेची चर्चा; टेलिव्हिजनमध्ये प्रथमच दिसणार गूढ जादुई दुनिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 10:28 IST

‘जादू तेरी नजर - डायन का मौसम’ मालिकेची चर्चा रंगली असून स्टार प्रवाहवर ही खास मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

बहुप्रतिक्षित ‘जादू तेरी नज़र-डायन का मौसम’ या सुपरनॅचरल मालिकेची चर्चा आहे. ‘जादू तेरी नजर- डायन स्लेअर या त्यांच्या गेम शोसह दाखल होत असून या मालिकेसह वैविध्यपूर्ण विषयांची मेजवानी प्रेक्षकांकरता पेश करत स्टार प्लस वाहिनीने चित्तवेधक आशय सादर करण्यात मुसंडी मारली आहे. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी या मालिकेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी या मालिकेत अनुक्रमे विहान आणि गौरी या मुख्य पात्रांची भूमिका साकारणारे प्रमुख कलाकार झैन इबाद खान आणि खुशी दुबे हे उमदे कलाकारही उपस्थित होते.

या कार्यक्रमात 'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेतील मुख्य कलाकार समृद्धी शुक्ला (अभिरा) आणि रोहित पुरोहित (अरमान) तसेच ‘उडने की आशा’ मालिकेतील कंवर ढिल्लन (सचिन) आणि नेहा हरसोरा (सायली) हे लोकप्रिय कलावंतही सहभागी झाले होते. या कलाकारांनी या मालिकेच्या उद्घाटनपर कार्यक्रमादरम्यान आयोजित विविध रंजक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला.

माध्यमांशी संवाद साधताना, झेन इबाद खान आणि खुशी दुबे यांनी त्यांच्या भूमिका, मालिकेचा सुपरनॅचरल परिसर आणि विहान व गौरी यांच्या नात्याचा रोमांचक प्रवास कथन केला. झेन आणि खुशी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एकत्र झळकल्याने प्रेक्षकांना आनंद झाला आहे, याचे  कारण काळ्या शक्तीच्या आणि गूढ वळणांच्या जगात अडकलेल्या या पात्रांचे चित्रण करताना त्यांच्यातील निर्विवाद मैत्री पुन्हा जिवंत होईल, असे प्रेक्षकांना वाटते.

‘जादू तेरी नज़र - डायन का मौसम’ ही मालिका विहान आणि गौरी यांच्या गुंतागुंतीच्या, मात्र स्वारस्यपूर्ण जगाची सफर प्रेक्षकांना घडवून आणण्याकरता सज्ज झाली आहे. ज्यात या दोन्ही पात्रांना एकत्र आणणाऱ्या नशिबाच्या वळणांवर प्रकाशझोत टाकला जाईल. त्यांचे नशीब परस्परांशी कसे जुळते हे  ‘जादू तेरी नज़र - डायन का मौसम’ मालिकेत पाहायला मिळेल. ‘जादू तेरी नज़र - डायन का मौसम’ ही मालिका ‘स्टार प्लस’ वाहिनीवर १८ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होणार आहे.

टॅग्स :स्टार प्लसटेलिव्हिजन