Join us

​नकुशी मालिकेमुळे मला ओळख मिळाली असे सांगतायेत जगन्नाथ निवंगुणे उर्फ जग्गू दादा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 10:15 AM

गेली २७ वर्ष नाटक, चित्रपट, टीव्ही मालिकांमध्ये अभिनेता जगन्नाथ निवंगुणे उर्फ जग्गू दादा काम करत आहेत. स्टार प्रवाहबरोबर तर ...

गेली २७ वर्ष नाटक, चित्रपट, टीव्ही मालिकांमध्ये अभिनेता जगन्नाथ निवंगुणे उर्फ जग्गू दादा काम करत आहेत. स्टार प्रवाहबरोबर तर त्यांचे नाते फारच जुने आणि घनिष्ट आहे. स्टार प्रवाहच्या 'राजा शिवछत्रपती', 'अग्निहोत्र', 'मन उधाण वाऱ्याचे', 'लक्ष्य', 'नकुशी' अशा सर्व गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या मालिकांतील त्यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुकही केले आहे. राजा शिवछत्रपती या मालिकेतील कान्होजी जेधे, लक्ष्य मधील इन्स्पेक्टर विरेंद्र कदम या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. आता नकुशी मालिकेत सध्या ते एक प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. नकुशी मालिकेत ते साकारत असलेले चंदू भाईची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. ही एका खलनायकाची भूमिका असली तरी प्रेक्षकांची खूप चांगली पसंती या भूमिकेला मिळत आहे.नकुशी या मालिकेतील चंदू भाई या भूमिकेला मिळत असलेल्या प्रेक्षकांच्या पसंतीमुळे सध्या जगन्नाथ निवंगुणे उर्फ जग्गू दादा खूपच खूश आहेत. या विषयी ते सांगतात, स्टार प्रवाह वाहिनी सुरू झाल्यापासून अनेक मालिकांमध्ये मला अभिनय करण्याची संधी मिळाली. वेगवेगळ्या भूमिका साकारायला मिळाल्या. स्टार प्रवाह चॅनलने मला स्टार बनवले त्यामुळे या वाहिनीचे माझ्या आयुष्यात एक खास स्थान आहे.पोलिसांच्या आयुष्यावर आधारित 'लक्ष्य' या मालिकेतील इन्स्पेक्टरच्या भूमिकेने मला लोकांच्या घराघरात पोहोचवले. या इन्स्पेक्टरला दोन स्टार होते. मात्र, स्टार प्रवाहने मला फाईव्ह स्टार दिले. अशोक समर्थ, आदिती सारंगधर, कमलेश सावंत यांच्यासारख्या लोकप्रिय कलाकारांसह मलाही या मालिकेमुळे ओळख मिळाली,' असे देखील जगन्नाथ निवंगुणे पुढे सांगतात.'स्टार प्रवाहने मला नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याची संधी दिली आहे. नकुशी या मालिकेत मला उत्तम अभिनेत्यांसह काम करता आले. विशेषत: राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला अभिनेता उपेंद्र लिमये जो एक कलाकार म्हणून श्रेष्ठ आहेच, मात्र माणूस म्हणूनही संवेदनशील आहे. नकुशी या मालिकेत काम करण्याचा अनुभव मला समृद्ध करणारा आहे,' असं त्यांनी आवर्जून सांगितले.Also Read : उपेंद्र लिमयेची संवेदनशील बाजू नकुशी टीमला दिसली