'जमाई राजा' मालिकेतील अभिनेत्री सारा अरफीन सध्या आपली प्रेग्नंसी इन्जॉय करत आहे. सारा ही लंडनमध्ये राहात असून तिथेच तिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तिच्या कुटुंबियांसह तिचे जवळचे नातेवाईकही तिला आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. काही महिन्यापूर्वीच सारानेच सोशल मीडियाद्वारे तिची ही गुड न्यूज सगळ्यांना सांगितली होती. तिने तिचे पती आफरीन खान सोबतचा फोटो पोस्ट करत तिच्या घरात एका चिमुकल्याचे आगमन होणार असल्याचे इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये म्हटले होते.
आता तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो तिनेच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केले आहेत. फोटो शेअर करत तिने समर्पक असे कॅप्शनही दिले आहे. एका स्त्री साठी आई होणे सुंदर क्षण असतात. माझ्या या क्षणी माझ्या मित्र परिवाराने मला साथ दिली त्यासाठी त्यांचे आभारही ती मानयला विसरली नाही. शेअर केलेल्या फोटोत सारा या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या चाहत्यांना तिचे हे फोटो प्रचंड आवडत आहेत. तिला या फोटोद्वारे तिचे चाहते शुभेच्छा देत असून तिच्या फोटोंना भरभरून लाइक्स देत आहेत. साराने बेबी बंम्पसह खास फोटोशूटही केले आहेत. या फोटोत बेबी बंप फ्लॉन्ट करताना पाहायला मिळत आहे.
सारा ने 2009 मध्ये आफरीन खानसह लग्न केले होते.तिच्या लग्नाला आता 10 वर्ष झाली आहेत. साराला 'जमाई राजा' या टीव्ही मालिकेतून लोकप्रियता मिळाली होती. टीव्ही मालिकानंतर 'इमरान खान आणि कटरीना कैफ स्टारर ' मेरे ब्रदर की दुल्हन', टोटल स्यापा आणि पेबॅक सिनेमातही सारा झळकली होती.