Join us  

Janmashtami 2024 : श्रीकृष्णाची पूजा करताना अंकिता लोखंडेकडून मोठी चूक, नेटकरी म्हणाले- "पूजा करताना तरी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 12:12 PM

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अंकिताने घरी कृ्ष्णाची पूजा केली. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

देशभरात सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरा केला जातो. घरोघरी कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. अनेक सेलिब्रिटीही मोठ्या आनंदाने श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरा करतात. काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडेने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त व्हिडिओ शेअर केला आहे. पण, या व्हिडिओवरुन नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अंकिताने घरी कृ्ष्णाची पूजा केली. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता श्रीकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करत करताना दिसत आहे. पण, अभिनेत्रीची एक गोष्ट मात्र नेटकऱ्यांना खटकली आहे. अंकिताचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अंकिता या व्हिडिओत बाथरोबमध्ये दिसत आहे. तर तिच्या केसालाही टॉवेल गुंडाळल्याचं पाहायला मिळत आहे. अंकिताने या लूकमध्ये पूजा केल्याचं नेटकऱ्यांना खटकलं आहे. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

"पूजा करताना तरी नीट ड्रेस घालायचा...", "असा ड्रेस घालून पूजा कोण करतं", "पूजा नाही फक्त ड्रामा आहे. कपडे पण व्यवस्थित घातलेले नाहीत" असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर अंकिताने डाव्या हातात अगरबत्ती पकडल्यानेही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. "उलट्या हाताने आरती करत नाहीत", "अगरबत्ती उलट्या हातात पकडत नाहीत", अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

दरम्यान, 'पवित्रा रिश्ता' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंकिता सध्या 'लाफ्टर शेफ'मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या शोमध्ये ती पती विकी जैनसह सहभागी झाली आहे. याआधी अंकिता 'बिग बॉस'मध्ये दिसली होती. तिने काही सिनेमांमध्येही काम केलंआहे. 

टॅग्स :जन्माष्टमीटिव्ही कलाकारअंकिता लोखंडे