'बिग बॉस सीझन 12' मध्ये सगळ्यात वादग्रस्त ठरले 65 वर्षीय भजन सम्राट अनुप जलोटा आणि त्यांची 28 वर्षीय गर्लफ्रेंड जसलीन मथारु यांची जोडी. गेल्या 3 वर्षांपासून रिलेशिनशिपमध्ये असणारी ही जोडी बिग बॉसच्या स्टेजवर अवतरली त्यावेळी सलमान खानसह रसिकांनाही धक्का बसला. अनुप जलोटा आणि जसलीन यांच्या या कथित रिलेशनशिपवर कुणाचाही विश्वास बसला नव्हता. भजनसम्राट अनुप जलोटा असे काही करतील यावरच कोणाचा विश्वास बसला नव्हता. या अजब गजब जोडीची मात्र सर्वत्रच चर्चा झाली होती.
इतकेच नाही तर सोशल मीडियावरही अनुप जलोटा आणि जसलीन यांच्यावर मीम्स, शायरी आणि जोक्स व्हायरल झाले होते. अनुप आणि जसलीन यांच्या नात्याला जसलीनचे वडिल केसर मथारु यांनीही नाकारलं होते. हे सगळे बनावट असल्याचा केसर मथारु यांनी त्यावेळी दावा केला होता. अखेर अनुप जलोटा घराबाहे आले तेव्हा त्यांनी हे सगळे पब्लिसिटीसाठी केल्याचे सांगत यावर सारावसारव केली. आता पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत आली आहे.
जसलीनचे लग्न होणार असून अनुप तिचे कन्यादान करण्यासाठी तयार आहेत. ‘मी जसलीनसाठी कन्यादान करेल. ती माझ्या मुलीसारखी असल्याचे त्यांनी म्हटले आहे..