Join us

माझे म्हातारे बाबा वणवण भटकत होते...! जास्मीन भसीनने पोस्ट लिहून सांगितली आपबीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 12:30 IST

अनेक जण कोरोना लसीसाठी तासांतास रांगेत उभे राहत आहेत तर अनेक जण  बेड, ऑक्सिजनसाठी वणवण फिरत आहेत. बिग बॉस 14 फेम जास्मीन भसीन हिच्यावरही अलीकडे असाच प्रसंग ओढवला.

ठळक मुद्देआत्तापर्यंत टीव्ही आणि बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. स्थिती भीषण आहे.

कोरोनापुढे लोक हतबल झाले आहेत. रोज लाखोंच्या संख्येने नवे रूग्ण समोर येत आहेत. हजारो जीव गमवत आहेत. अशात ऑक्सिजन, बेड आणि औषधांच्या कमतरतेमुळे रूग्णांच्या नातेवाईकाचे प्रचंड हाल होत आहेत. बेडसाठी आणि ऑक्सिजनसाठी अनेक लोक वणवण फिरत आहेत. बिग बॉस 14 फेम जास्मीन भसीन हिच्यावरही अलीकडे असाच प्रसंग ओढवला. आईला रूग्णालयात बेड मिळावा म्हणून जास्मीनच्या वडिलांना प्रचंड धावाधाव करावी लागली.जास्मीनने सोशल मीडियावर ही आपबीती सांगितली आहे.

हा प्रसंग सांगताना जास्मीनने ट्विटरवर लिहिले, ‘खूप दु:खी आहे. रोज मृत्यू होत आहेत. लोक ऑक्सिजन व बेडच्या शोधात रस्त्यावर वणवण भटकत आहेत. दोन दिवसांपूर्वी माझ्या आईलाही याच स्थितीतून जावे लागले. तिला बेड मिळण्यासाठी खूप धावाधाव करावी लागली. माझे वयोवृद्ध आई-वडील उपचारासाठी चौफेर वणवण भटकले. अनेक लोक याच स्थितीतून जात आहेत.’दुस-या ट्विटमध्ये जास्मीनने यंत्रणेवर बोट ठेवले.

‘लोक आपल्या आप्तांना, मित्रांना गमवत आहेत. आम्ही कोणाला दोष द्यायचा? आपली यंत्रणा अपयशी ठरली का?’ असा सवाल तिने केला.आत्तापर्यंत टीव्ही आणि बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. स्थिती भीषण आहे. लोकप्रिय चित्रपट व टीव्ही अभिनेता अनिरूद्ध दवे सध्या भोपाळमध्ये आयसीयूमध्ये भरती आहे. त्याच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झाला आहे. अभिनेते रणधीर कपूरही कोरोना पॉझिटीव्ह असून सध्या रूग्णालयात भरती आहेत. कालच दिग्गज अभिनेते ब्रिकमजीत कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

टॅग्स :जास्मीन भसीन