Join us

​सारेगमप लिटिल चॅम्पस या कार्यक्रमात जावेद अली चढला घोड्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2017 5:28 AM

सारेगमप लिटिल चॅम्पस या कार्यक्रमाचे सध्या ऑडिशन एपिसोड्स सुरू आहेत. या ऑडिशनला येणाऱ्या सगळ्याच चिमुकल्यांचा आवाज सरस आहे. त्यामुळे ...

सारेगमप लिटिल चॅम्पस या कार्यक्रमाचे सध्या ऑडिशन एपिसोड्स सुरू आहेत. या ऑडिशनला येणाऱ्या सगळ्याच चिमुकल्यांचा आवाज सरस आहे. त्यामुळे यांचे आवाज ऐकून जजेस आणि मेन्टर्स चकित होत आहेत. या सगळ्यांमधून कोणाची निवड करायची आणि कोणाला वगळायचे याचे चांगलेच टेन्शन परीक्षकांना आले आहे. या सगळ्याच मुलांना गाण्याची आवड आहे, तसेच त्यांच्यात शिकण्याची इच्छादेखील असून त्यांना स्वतःला सिद्ध करून दाखवायचे आहे. सारेगमप लिटिल चॅम्पस या कार्यक्रमातील स्पर्धक ही लहान मुले असल्याने चित्रीकरण करताना या कार्यक्रमाचे परीक्षक हिमेश रेशमिया, नेहा कक्कर आणि जावेद अली या लहान मुलांसोबत लहान होऊन जातात. त्यांच्यासोबत मजा-मस्ती करतात. लहान मुलांना कार्यक्रमाचे, स्पर्धेचे दपडण येऊ नये यासाठी त्यांचा सतत प्रयत्न सुरू असतो. या कार्यक्रमाच्या सेटवर नुकताच एक घोडा आणण्यात आला होता. त्या घोड्यावर चक्क जावेद अली बसला आणि त्याने या कार्यक्रमातील स्पर्धक शण्मुखप्रिया हिच्या आईसाठी एक गाणे गायले. जावेद अली हा बाहुबलीसारखा दिसत असल्याचे शण्मुखप्रियाच्या आईचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी जावेदने गाणे गायल्याने त्या भारावून गेल्या होत्या. लहान मुलांच्या या रिअॅलिटी शोमध्ये सगळेच परीक्षक आपण एक प्रसिद्ध गायक असल्याचे विसरून स्पर्धकांसोबत एखाद्या लहान मुलासारखेच वागत असल्याने या कार्यक्रमातील सगळीच लहान मुले खूप खूश आहेत. या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचा आवाज परीक्षकांना खूप आवडत आहे. पण त्यातही ओडिशाचा सत्यजीत जेना याने आपल्या परफॉर्मन्समधून सगळ्या परीक्षकांचे मन जिंकले आहे. तर नागपूरच्या उत्कर्ष वानखेडेनेदेखील गुरू या चित्रपटातील गाणे अतिशय चांगल्याप्रकारे गाऊन परीक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला तर श्रेयन भट्टाचार्यनच्या सपनों से भरे नैना या गाण्याला सगळ्यांनी उभे राहून दाद दिली.