Join us

'बिग बी' यांनी केबीसी होस्ट करण्याच्या निर्णयाला जया बच्चन यांचा होता विरोध; काय होतं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 3:54 PM

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)'कौन बनेगा करोडपती' (kaun banega crorepati) हा रिअ‍ॅलिटी शो बऱ्याच वर्षांपासून होस्ट करत आहेत.

Jaya Bachchan On KBC : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)'कौन बनेगा करोडपती' (kaun banega crorepati) हा रिअ‍ॅलिटी शो बऱ्याच वर्षांपासून होस्ट करत आहेत. 'केबीसी'च्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांची मनं जिंकली. परंतु असं असतानाही 'बिग बीं'नी हा शो होस्ट करू नये अशी जया बच्चन यांना वाटतं होतं. याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला होता. 

२००८ मध्ये फॅशन डिझायनर अबु जानी आणि संदीप खोसला यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. 'कौन बनेगा करोडपती' हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो आहे. अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न  केबीसीच्या माध्यमातून पूर्ण झालं आहे. सध्या या शोचे १६ वे पर्व सुरू आहे. जवळपास २४ वर्षांपासून हा शो स्पर्धकांचे मनोरंजन करत आहे. या क्विझ शोमध्ये स्पर्धक प्रश्नांची उत्तरं देऊन पैसे जिंकतात.आतापर्यंत या शोला अनेक करोडपती स्पर्धकही मिळाले आहेत. बिग बीं ‘कौन बनेगा करोडपती’ च्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करत आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे केबीसीला नवी ओळख मिळाली.

‘कौन बनेगा करोडपती’ हा शो २००० साली पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आला. परंतु बिग बींनी हा शो होस्ट करू नये अशी जया बच्चन यांना वाटतं होतं. त्यावेळी सुपरस्टार अमिताभ यांनी छोट्या पडद्यावर काम केल्याने त्याचा परिणाम त्यांच्या लोकप्रियतेवर होईल, असं त्यांना वाटत होतं.  यशाच्या शिखरावर असताना अमिताभ बच्चन यांनी केबीसी होस्ट करण्याचा निर्णय अनेकांना मान्य नव्हता. पण, बिग बींनी हे आव्हान स्विकारलं. सध्याच्या घडीला पाहायला गेल्यास हा शो प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. 

टॅग्स :अमिताभ बच्चनजया बच्चनकौन बनेगा करोडपतीटेलिव्हिजन