Join us

जयडी उर्फ पूर्वा शिंदे लवकरच येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 2:43 PM

जयडी म्हणजेच अभिनेत्री पूर्वा शिंदे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

'तुझं माझं जमतंय’ ही मालिका नुकतीच झी युवा वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि सुरुवाती पासूनच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. अपूर्वा नेमळेकरने या मालिकेतून टीव्ही माध्यमात पुनरागमन केले आहे. त्यामुळे तिला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायला मिळते आहे. याचा आनंद प्रेक्षकांना आहे. अपूर्वा सोबतच रोशन विचारे आणि मोनिका बागुल या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. या मालिकेचं शूटिंग नगरमध्ये सुरु असून आता या मालिकेत एक नवीन चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची लाडकी जयडी म्हणजेच अभिनेत्री पूर्वा शिंदे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

'तुझं माझं जमतंय’ मालिकेत पूर्वा शिंदे राजनंदिनीची भूमिका साकारते आहे. तिने इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना मालिकेतील लूक शेअर करत खूशखूबर दिली आहे. तिने फोटो शेअर करत म्हटले की, राजनंदिनी नव्याने तुम्हा सगळ्यांना भेटायला येते आहे. 

राजनंदिनी म्हणजे अत्यंत सोज्वळ, गोड, सगळ्यांना सांभाळून घेणारी, आदर्श सून, आदर्श मुलगी, आदर्श बायको आणि सतत चेहऱ्यावर हास्य असणारी अशी आहे. जयडी सारख्या निगेटिव्ह भूमिकेनंतर आता राजनंदिनी सारखी सकारत्मक आणि गोड मुलगी म्हणून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

'लागिरं झालं जी' या लोकप्रिय मालिकेत पूर्वाने खलनायिकेची भूमिका साकारली होती. पूर्वाने 'जयडी' ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. पूर्वा अभिनेत्रीच नाही तर एक सुंदर नृत्यांगनासुद्धा आहे. तर पूर्वा शिंदे झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

टॅग्स :पूर्वा शिंदेअपूर्वा नेमळेकर