Join us

‘जीजी माँ’तील प्रणयदृष्यांना भाविका शर्माचा नकार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 7:30 AM

टीव्ही मालिकांतील कथानक हळूहळू धाडसी होत असून मालिकांतील प्रणयदृष्य ही काही आता चर्चेचा विषय राहिली नसली,तरी काही नवे कलाकार ...

टीव्ही मालिकांतील कथानक हळूहळू धाडसी होत असून मालिकांतील प्रणयदृष्य ही काही आता चर्चेचा विषय राहिली नसली,तरी काही नवे कलाकार अशा दृष्यांना नकार देत आहेत.‘जीजी माँ’ मालिकेतील नायक-नायिकेचे लग्न झाल्यानंतर कथानक अधिकच उत्कंठावर्धक बनले आहे.मालिकेच्या सध्याच्या कथानकात सुयश (दिशंक अरोरा) आणि फाल्गुनी (तन्वी डोग्रा) यांच्यात खटके उडत असून नियती (भाविका शर्मा) आणि विधान (सुभाशीष झा) यांच्यात मात्र प्रेमाचा अंकुर फुटताना दिसतो आहे.मालिकेच्या कथानकानुसार आपल्यातील प्रेमाचा आविष्कार करण्यासाठी सुयश आणि फाल्गुनी यांच्यावर काही प्रणयदृष्ये चित्रीत करण्यात येणार होती. पण फाल्गुनीची भूमिका साकारणा-या भाविका शर्माने अशी दृष्ये चित्रीत करण्यास थेट नकार दिला.पडद्यावर अशी दृष्ये चित्रीत करताना तिला अवघडल्यासारखे होते,असे तिने निर्मात्यांनासांगितले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,आपल्या प्रियकराने आपला हात धरण्यास किंवा त्याला आलिंगन देण्यास तिने मंजुरी दिली आहे.अशी दृष्ये देण्यास आपण अजून वयाने लहान असून आपले कुटुंबीय ही मालिका पाहात असल्याने अशी दृष्ये चित्रीत करणे आपल्याला जमणार नाही,असे भाविकाने सांगितले.या मालिकेच्या सेटवर सध्या लव्ह इज इन द एअर अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाल्याच्या खुमासदार चर्चा सध्या रंगल्या आहेत.भाविका शर्मा आणि सुभाशीष झा यांची रिल लव्ह स्टोरी आता रियल लाइफमध्येही सुरु झाल्याचं बोललं जात आहे. दोघंही प्रेमाच्या नात्यात बुडाल्याचं बोललं जात आहे.भाविका शर्मा आणि सुभाशीष एकमेकांना पसंत करत असून बराच काळ एकत्र घालवत आहेत.दोघांमधील हे प्रेमाचं नातं दिवसेंदिवस आणखी घट्ट बनत चाललं आहे.निव्वळ मैत्री या शब्दांपलीकडे या दोघांच्या नात्याकडे पाहिलं जात आहे.या प्रेमाच्या नात्याची आणि दोघंही एकत्र बराच काळ घालवत असल्याची कल्पना मालिकेच्या सेटवरही प्रत्येकाला आलीच आहे.एकमेकांसाठी खूप स्पेशल असल्याचे सेटवरही सा-यांनाच कळाले आहे.दोघे एकत्रच बाहेर जातात,एकत्रच जेवतात,शूटिंग करतात आणि दोघेही एकमेकांबरोबर भरपूर ‘सेल्फी’ काढत असतात.या दोघांच्या नात्यांमध्ये प्रेमाचे वारे वाहु लागल्याचे कळते आहे.भाविका आणि सुभाशीष हे दोघे ऑनस्क्रीन रोमँटीक कपल म्हणून खूप पसंत केले जाते.त्यामुळेच वास्तव जीवनातही हे नाते निर्माण करावे अशीच चाहत्यांचीही इच्छा असणार.या दोघांचे लाखो फॅन्स आहेत.त्यामुळे ऑनस्क्रीन रंगणा-या या कपलची लव्ह स्टोरी आता वास्तविक जीवनातही फुलु लागल्यामुळे चाहत्यांनाही या दोघांनी एक सुखद धक्काच दिला आहे.