Join us  

Yogita- Saurabh : लग्नाच्या दोन महिन्यानंतर मराठमोळ्या कपलने चाहत्यांना दिली गूड न्यूज, घेतलं स्वतः चं घर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 9:57 AM

अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले सध्या चर्चेत आले आहेत.

'जीव माझा गुंतला' फेम अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले  ३ मार्च २०२४ रोजी आयुष्यभराचे जीवनसाथी झाले. दोघांनी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. या शाही विवाह सोहळ्याची विशेष चर्चा रंगली होती. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर योगिता आणि सौरभने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. या दोघांनी सोशल मीडियावर गृहप्रवेशाचे फोटो पोस्ट केले आहेत. 

योगिता आणि सौरभने स्वतःच्या हक्काच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. सौरभने इन्स्टाग्रामवर खास कॅप्शन देत घराचे फोटो शेअर केले आहेत.  'एक स्वप्न आपलं, एकत्र पूर्ण करूया. नवीन शहरात, नवीन संसार थाटूया', असं कॅप्शन दिले आहे. पहिल्या फोटोमध्ये दोघंही घरात गृहप्रवेश करताना दिसत आहेत. यावेळी दोघांचा पारंपरिक लूक पाहायला मिळाला. सौरभने सदरा आणि धोतर परिधान केले आहे तर योगिताने गुलाबी रंगाची काठपदर साडी नेसली आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये योगिता व सौरभ यांच्या नावाची आकर्षक अशी नेमप्लेट लक्ष वेधून घेत आहे.

सौरभने घराचे फोटो शेअर करताना पवई लोकेशन मेन्शन केलं आहे. याचाच अर्थ योगिता आणि सौरभचं नवं घर पवईत आहे. सौरभ आणि योगितावर चाहते आणि मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. योगिता व सौरभ सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नेहमीच काही ना काही शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.

 योगिता  आणि सौरभ यांची 'जीव माझा गुंतला' या मालिकेच्या सेटवर लव्हस्टोरी खुलली होती. यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, 'जीव माझा गुंतला' नंतर योगिता कुठल्याही मालिकेत झळकली नाही. तर सौरभ हा 'सन मराठी' वाहिनीवरील 'सुंदरी' मालिकेत दिसला. या मालिकेत त्याने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वीच त्याची 'सुंदरी' मालिकेतून एक्झिट झाली.   

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीटेलिव्हिजनलग्नसुंदर गृहनियोजनमुंबई