Join us

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत जेठालाल अडकणार या संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 16:11 IST

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील जेठालाल आणि संकट यांचे खूप जवळचे नाते असल्याचे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आता जेठालाल आणखी एका संकटात अडकणार आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेचे नुकतेच दहा वर्षं पूर्ण झाले आहेत. कोणत्याही कॉमेडी मालिकेने प्रेक्षकांचे इतके वर्षं मनोरंजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल, अब्दुल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेला दहा वर्ष झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील जेठालाल आणि संकट यांचे खूप जवळचे नाते असल्याचे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आता जेठालाल आणखी एका संकटात अडकणार आहे. जेठालालाच्या गडा इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात अधिकाधिक लोकांनी खरेदी करावी यासाठी नट्टू काका आणि बागा एक स्कीम सुरू करणार आहेत. पण या स्कीममुळे जेठालालच्या डोक्याला ताप होणार आहे. 

नट्टू काका आणि बागा यांनी सुरू केलेल्या स्कीमनुसार गडा इलेक्ट्रोनिक्समध्ये कोणत्याही ग्राहकाने 100 रुपयांपेक्षा अधिक खरेदी केली तर त्यांना एक प्लेट पाणीपुरी फ्री मिळणार आहे. सुरुवातीला जेठालालला नट्टू काका आणि बागा यांची ही आयडिया आवडणार नाहीये. पण पाणीपुरी ही सगळ्यांचीच आवडती असते ही गोष्ट जेठालालला नट्टू काका आणि बागा पटवून देणार आहेत. त्यामुळे तो ही स्कीम सुरू करायचे ठरवणार आहे. आता या स्कीममुळे जेठालालला फायदा होतो की तोटा हे प्रेक्षकांना तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका पाहिल्यावरच कळणार आहे. 

नट्टू काका आणि बागा यांनी आजवर दुकानात ज्या ज्या स्कीम आणल्या, त्यामुळे जेठालालला नुकसानच झालेले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा जेठालाल कोणत्या संकटात सापडला आहे का हे पाहणे मजेशीर ठरणार आहे. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा